शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बेस्ट पोलिस स्टेशन अवाॅर्ड गोज टू अर्जुनी मोरगाव; राज्यात चौथ्या स्थानी

By नरेश रहिले | Updated: July 6, 2023 18:50 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

नरेश रहिलेगोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. सन २०२१ मध्ये अर्जुनी-मोरगावचे तत्कालीन ठाणेदार व सध्या गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या कुशलतेमुळे हा सन्मान जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी त्यांना हा सन्मान मुंबई येथे पोलिस महासंचालकांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सन २०१६ मध्ये झालेल्या परिषदेत निकोप स्पर्धा वाढावी, कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची ‘बेस्ट पोलिस स्टेशन’ म्हणून निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालयाकडून करण्यात येते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला. सन २०२० या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची निवड करून या पोलिस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.निवड समितीत यांचा समावेशत्याच धर्तीवर सन २०२१ या वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरिता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली यांची बारकाईने तपासणी करून सर्व पोलिस ठाण्यांचे मूल्यमापन करून त्यापैकी २ उत्कृष्ट पोलिस ठाणी निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त यांनी घटकनिहाय, परिमंडळनिहाय प्राप्त प्रत्येकी दोन पोलिस ठाण्यांमधून परिक्षेत्र, आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट दोन पोलिस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती आणि परिक्षेत्रनिहाय व आयुक्तालयनिहाय प्राप्तः उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून ५ सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणी निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आल्या होत्या.पाेलिस अधीक्षकांनी दिली कौतुकाची थापसन २०२१ या वर्षातील कार्यमूल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्रनिहाय व आयुक्तालयनिहाय प्राप्त उत्कृष्ट पोलिस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ५ पोलिस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केली होती. सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून घोषित करण्यात आलेल्या अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यातील ठाणेदार व कर्मचाऱ्यांचे कौतुक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.ही पोलिस ठाणी सर्वोत्कृष्टराज्यात पहिल्या क्रमांकावर शिवाजीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर), दुसऱ्या क्रमांकावर देगलुर पोलिस ठाणे (नांदेड), तिसऱ्या क्रमांकावर वाळुंज पोलिस ठाणे (छत्रपती संभाजीनगर शहर), चौथे अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे (गोंदिया) व पाचवे राबोडी पोलिस ठाणे (ठाणे शहर) अशा पाच पोलिस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून राज्य स्तरावरील समितीने घोषित केले आहे.या निकषांच्या आधारावर पुरस्कारराज्यातील पोलिस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलिस अधिकारी, अंमलदार यांना प्रोत्साहित करणे या निकषांमुळे अर्जुनी मोरगाव पोलिस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे