शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना कल्याणकारी योजनांचा लाभ

By admin | Updated: October 17, 2016 00:34 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस

महत्व मनरेगाचे : गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’ या संकल्पनेंतर्गत ग्राम रोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची माहिती मजुरांना देण्यात आली. ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले अशा मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.याप्रसंगी नायब तहसीलदार मेश्राम यांनी सांगितले, महसूल विभागाकडून मजुरांना आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, सातबारा देण्यात आले. सन २०१६-१७ मजुरांची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचाना देण्यात आला. सहायक कार्यक्र म अधिकारी भारत बोदेले यांनी मनरेगाविषयी ग्रामस्थांना वैयक्तीक शौचालय, सिंचन विहिरी, गुरांचे गोठे, शोष खड्डे व कृषी कामांचे ग्रामस्थांना महत्व पटवून दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत गोंगले व राजगुडा येथे एक दिवस मजुरासोबत या संकल्पनेंंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी सरिता कापगते होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य शीला चव्हाण, पं.स. सडक-अर्जुनी उपसभापती विलास शिवणकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे उपस्थित होते. मनरेगा अंतर्गत एक दिवस मजुरासोबत उपस्थित राहून ग्राम रोजगार दिवसाचे महत्व जाणून घेण्याच्या दृष्टीने शासकीय योजनेची माहिती सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगले व राजगुडा या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली.कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी झेड.डी. टेंभरे, पुष्पा पंचभाई, सरपंच दामिनी गावळ, उपसरपंच ए.एम. लेदे, एम.एस. धोंगळे, विस्तार अधिकारी एस.आय. वैद्य, सचिव पुष्पा चाचेरे, डी.जी. कोटांगले, तांत्रिक अधिकारी पी.के. कापगते तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व रोजगार सेवक उपस्थित होते.राजगुडा हे गाव जंगलव्याप्त असून आदिवासी बांधवांची लोकसंख्या जास्त आहे. राजगुडा व गोंगले जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये घेण्यात आले. या गावामध्ये विविध कामाचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक, संचालन व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक व्ही.के. गोबाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)