शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान व अनुभवाचा लाभ यशासाठी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : उपायुक्तपदी बढती झालेल्या डीपीओंचा सत्कारगोंदिया : प्रशासनात काम करताना यशस्वी होण्यासाठी विषयाची हाताळणी, त्याची मांडणी करण्याचे कौशल्य असले पाहिजे. विषयाचे सखोल ज्ञान आणि कामाचा दांडगा अनुभव असेल तर अधिकारी यशस्वी होतो. घाटे यांच्याकडे हे गुण असल्यामुळे ते यशस्वी अधिकारी ठरले, असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. शुक्रवारी १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे यांचे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय येथे उपायुक्त (नियोजन) म्हणून पदोन्नतीने स्थानांतरण झाले. त्याबद्दल त्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सत्कारमूर्ती बकूल घाटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी ठाकरे, शिंदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, मानव विकास मिशनच्या जिल्हा नियोजन अधिकारी भूते, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन अधिकारी चांगला असेल तर कामात यश मिळते. विविध यंत्रणांना दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च व्हावा यासाठी नियोजन अधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु न तो निधी वेळेतच खर्च झाला पाहिजे, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असावे. घाटे यांनी प्रत्येक जिल्हा नियोजन समितीची सभा आपले कौशल्य वापरु न व विषयांची योग्यप्रकारे मांडणी करु न यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्यालयात काही पदे रिक्त असतानादेखील त्यांनी चांगले काम केले आहे. जिल्हा नियोजन समतीच्या निधीचा त्यांनी चांगल्याप्रकारे विनियोग केला आहे. मार्च २०१६ अखेर १०० टक्के डीपीडीसीचा निधी त्यांच्या माध्यमातून यंत्रणांनी खर्च केला आहे. घाटे यांनी त्यांच्या कार्यालयाचे प्रभावी नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले.सत्काराला उत्तर देताना घाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमुळे चांगले काम करता आले. विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदाऱ्या यादेखील यशस्वीपणे पार पाडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करताना विविध यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यासाठी व निधी वेळेवर खर्च करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.मोहिते म्हणाले की, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत करु न काम केले तर चांगल्याप्रकारे आपण यशस्वी होतो, हे घाटे यांनी सिद्ध करु न दाखिवले, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घाटे यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रूजू झालेले तेजबहादूर तिडके यांच्याही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.या वेळी लोणकर, तिडके, भूत, बोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माला जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन कार्यालय, सांख्यिकी कार्यालय, रोहयो कार्यालय, भूसंपादन कार्यालय, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कडू यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)