शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:16 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ६६९७ घरकुलांचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही.

ठळक मुद्दे६६९७ घरकुलाच्या कामांना सुरुवातच नाही : दफ्तरदिरंगाईचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अभियानातंर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेतंर्गत घरकुल बांधकाम केले जात आहे. मात्र मागील दोन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ६६९७ घरकुलांचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही.त्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरेच असल्याचे चित्र आहे.मनरेगा अंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र सरकारने ४२३० कामांना मंजुरी दिली होती. मात्र ही कामे अद्यापही सुरू करण्यात आली नाही. तर यावर्षी सुरू करण्यात आलेल्या ५ हजार ४३१ कामांपैकी केवळ ३९५० कामे पूर्ण करण्यात आली आहे. या कामाच्या माध्यमातून ३ लाख ५६ हजार ७०५ मनुष्य दिवस काम उपलब्ध करुन देण्यात आले.त्याचप्रमाणे राज्य सरकारने ५ कामांना मंजुरी दिली होती मात्र ती सुध्दा अद्याप सुरू झालेली नाही. सन २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र सरकारच्या २४६७ कामांना मंजुरीे देण्यात आली होती.मात्र यापैकी एकही काम सुरू झाले नाही.राज्य सरकारच्या २८ कामांना मंजुरी देण्यात आली होती.त्यापैकी २२ कामे अद्यापही पूर्ण झालेली नाही.विभागात भंडारा जिल्हा अव्वलप्रधानमंत्री आवास व इंदिरा गांधी आवास योजनेची कामे पूर्ण करण्यात नागपूर विभागात भंडारा जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यात १७७८ कामांपैकी २१० कामे पूर्ण करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात ७२२ पैकी २००, चंद्रपूर जिल्ह्यात ९५२ पैकी १६५ कामे पूर्ण करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १२५८ कामे सुरू करण्यात आली. यापैकी केवळ १२१ कामे पूर्ण करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात ३६८ कामांपैकी ७३ व गडचिरोली जिल्ह्यात ५०६ कामांपैकी ६२ कामे पूर्ण करण्यात आली.राज्य योजनेच्या कामातही पिछाडीराज्य सरकारच्या आवास योजनेतंर्गत नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ३ घरकुलाचे काम पूर्ण करण्यात आले.भंडारा, गोंदिया, नागपूर, आणि वर्धा जिल्ह्यात एकाही आवास योजनेच्या कामाला मंजुरीे मिळाली नाही.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना