शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना असभ्य वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:40 IST

केंद्र सरकारने सर्वच बँकामधील ग्राहकांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे आदेश दिले आहे. आधार लिंक करण्याची मुदत संपत येत असल्याने ग्राहकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे.

ठळक मुद्देखाते बंद होण्याच्या भीतीने वाढली गर्दी : ग्राहकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ऑनलाईन लोकमतगोंदिया : केंद्र सरकारने सर्वच बँकामधील ग्राहकांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे आदेश दिले आहे. आधार लिंक करण्याची मुदत संपत येत असल्याने ग्राहकांची बँकामध्ये गर्दी वाढली आहे. आधीच आधार लिंक प्रक्रियेमुळे हैराण असलेल्या ग्राहकांना बँक कर्मचाºयांच्या असभ्य वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्याप्त आहे.विविध शासकीय योजनाचे अनुदान, पेशंन, कर्मचाऱ्यांचे वेतन स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये जमा होते. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांची संख्या निश्चितच अधिक आहे. त्यातच केंद्र सरकारने सर्व बँक खातेदारांचे खाते आधारकार्डसह ३१ मार्चपर्यंत लिंक करण्याचे निर्देश दिले आहे. या तारखेपर्यंत खाते आधारकार्डसह लिंक न करणाऱ्या ग्राहकांचे खाते बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. खाते बंद होण्याच्या भीतीने मागील दोन तीन दिवसांपासून बँकेमध्ये आधारकार्ड लिंक करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता बँकेने पर्यायी व्यवस्था अथवा ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे अपेक्षीत आहे. पण येथील अग्रेसन मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत मंगळवारी (दि.१३) खाते आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बँक कर्मचाऱ्यांनी असभ्य वागणूक दिली. ऐवढेच नव्हे तर अर्ज फेकून दिल्याचा आरोप ग्राहकांनी केली. बँकेत घडलेल्या यासर्व प्रकाराची तक्रार ग्राहकांनी लोकमत कार्यालय गाठून केली. तसेच ग्राहकांना योग्य वागणूक न देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.स्वतंत्र कक्ष सुरु कराग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता आधारकार्ड लिंक करण्यासाठी बँकेत काही दिवसांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणीआधारकार्ड लिंक करणाऱ्यांसाठी सर्वच बँकामध्ये सध्या ग्राहकांची गर्दी आहे. मात्र स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सर्वाधिक गर्दी असून यात अनेक पेशंनधारक ग्राहकांचा समावेश आहे. मात्र बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना योग्य वागणूक दिली जात नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यासर्व प्रकाराची दखल घेवून बँक व्यवस्थापनाला योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :bankबँक