शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहीम कारवाईला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:03 IST

शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा काही व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देमार्किंग करण्याचे काम सुरू : मुख्य मार्गांवरील अतिक्रमण काढणार

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा काही व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषदेतर्फे शहरात पाच सहा दिवसांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिक्रमणीत ठिकाणे मार्किंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.शहरातील वाढते अतिक्रमण आता शहरवासीय आणि प्रशासन या दोघांसाठीही डोकेदुखीचे ठरत आहे. वाढत्या अतिक्रमणाच्या या समस्येवर आळा घालण्यासाठी नगर परिषदेने मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत मारहाण करण्यापर्यंत प्रकरण गेले होते. त्यामुळे ही मोहीम थांबविण्याची वेळ नगर परिषदेवर आली. एकंदरीत नगर परिषद प्रशासनाला अतिक्रमणकर्त्यापुढे नमावे लागले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अतिक्रमणाचा हा विषय मागील कित्येक वर्षांपासून सुरू असून अद्याप कुठलाच तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर नगर परिषदेत भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांनी अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हालचाल करण्यास सुरूवात केली. शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यात नगर परिषद, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि नगररचना विभाग यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर आता सर्वप्रथम अतिक्रमण स्थळांना मार्कींग करण्याचे करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे. मार्कींगचे काम पूर्ण झाल्यावरच नगर परिषद पाच ते सहा दिवसांनी अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करणार आहे.