शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुरातन तलावांचे सौंदर्यीकरण करणार

By admin | Updated: October 7, 2016 02:01 IST

ऐतिहासिक पुरातन काळातील प्रतापगड पहाडीवरील तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल. त्याचप्रमाणे गणी अहमद ख्वाजा दर्ग्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यात येईल

पालकमंत्री : भूमिपूजन समारंभगोठणगाव : ऐतिहासिक पुरातन काळातील प्रतापगड पहाडीवरील तलावाचे सौंदर्यीकरण केले जाईल. त्याचप्रमाणे गणी अहमद ख्वाजा दर्ग्यावरील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष अर्थ सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रतापगड येथे विविध भूमिपूजन समारंभात केले.अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. भूमिपूजक व उद्घाटक सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, माजी आ. दयाराम कापगते, सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, कृउबास सभापती काशीफ जमा कुरेशी, माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य सुशिला हलमारे, जहीर पटेल कुरेशी, सरपंच अहिल्या वालदे, उपसरपंच तेजराम राऊत, तालुका भाजपा महामंत्री भोजराज लोगडे, यशवंत गणवीर, काशिनाथ ठाकरे, पोलीस पाटील योगेश जनबंधू, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी गणवीर, केवळराम पुस्तोडे, डॉ. कुंभरे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता शर्मा आदी मंचावर उपस्थित होते.ना. बडोले पुढे म्हणाले, प्रतापगड येथील महाशिवरात्रीला भरणारी यात्रा ‘क’ श्रेणीची आहे. ते आपण ‘ब’ श्रेणीमध्ये आणण्याचे काटेकोर प्रयत्न करणार. भक्त निवासापासून तिबेट कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाईल. ऐवढेच नाही तर प्रतापगडला जोडणाऱ्या चार बाजूच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले. या वेळी अधिकारी, पदाधिकारी व गावकरी यांनी मिळून संयुक्तरित्या एकत्रित घेवून विकास कामात सहकार्य करण्याचे आवाहन जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले. तर माजी आ. दयाराम कापगते यांनी प्रतापगड हे गाव एकेकाळी बेट असल्यासारखे होते, परंतु आता शासनाच्या विविध योजनेतून रस्ते, पायऱ्यांचे काम करण्यात आले. त्यामुळे पर्यटनाचे महत्व वाढल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली. भूमिपूजन समारंभ प्रतापगड ग्रामपंचायतने केले. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायणव जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी भावे यांनी केले. यावेळी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. (वार्ताहर)