शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:07 IST

इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत गोंदिया पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान कार्यक्रम मंगळवारी (दि.२३) आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सायबर तज्ज्ञ पियूष वर्मा व आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्रच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. समाजाला सायबर गुन्हेगारी विषयी जागरुक करण्याची गरज आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुलांनी पोलीस विभागाच्या मदतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेतला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग चांगले काम करीत आहे. मागास व दुर्गम भागातील मुलामुलींमध्ये चांगली जडणघडण करण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुध्दा निर्माण करुन त्यांना यशाचा मार्ग दाखिवण्यात येत आहे. मुलांचे करियर घडविण्याचे काम पोलीस विभाग करीत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे बडोले यांनी सांगितले.वालदे म्हणाले, बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचा व्यवहार होत असतो. त्यासाठी नागरिकांनी बँकेत व्यवहार करताना सदैव जागरूक रहावे. सोशल मिडियावर आपली वैयक्तिक माहिती देवू नये, जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. यासाठी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी इंटरनेट बँकींग, फिशींग, मोबाईल बँकींग, स्मीशिंग, युपीआय, ई-वॅलेट, युएसएसडी, कार्ड, युपीआय याबाबत माहिती दिली.डॉ.भूजबळ म्हणाले, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियानामुळे बँकींग व्यवहाराबाबत होणारी आॅनलाईन फसवणूक, सोशल मिडियाबाबत होणारे गुन्हे याबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.या वेळी रामअवतार अग्रवाल, आदेश शर्मा व पोलीस निरीक्षक दासुरकर यांनी बँकींग फ्रॉड व्यवहाराबाबत काही प्रश्न विचारले. वालदे यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. सायबर जनजागृती कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) खन्ना, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम