शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

काळाबाजार थांबविण्यासाठी सज्ज रहावे

By admin | Updated: June 26, 2014 23:23 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर

शिवणकर यांचे निर्देश : कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावागोंदिया : खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बी-बियाणे व खताचा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी यंत्रणेने कामचुकारपणा दाखवू नये. खत व बियाण्यांच्या काळाबाजारीवर आळा घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिले आहे. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला घेऊन जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्यस्तरीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीत कृषी विभागाचा आढावा घेत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान बैठकीत खरीप हंगामासाठी महाबीज व खासगी विक्रेत्यांकडून २३ जूनपर्यंत ३१ हजार ४११ क्विंटल बियाणे विक्री झाले असल्याचे माहिती दिली. सध्या जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा नाही, असेही सांगण्यात आले. ८० टक्के बियाण्यांची विक्री झालेली आहे. त्यातही कसलीही तक्रार आलेली नाही. यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीस आलेले नाही, असाही विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खताच्या बाबतीत आढावा सादर करताना त्यांनी सांगितले की, युरिया खतास ४४ हजार क्विंटलची मंजुरी मिळाली आहे. २३ जूनपर्यंत ९ हजार १०० क्विंटल खताचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजार २४७ क्विंटल खताचा साठा असून, जून अखेरपर्यंत १४ हजार क्विंटल युरिया खताची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी दोन हजार ५०० क्विंटल युरिया खत प्राप्त झाले आहे. १२ हजार क्विंटल युरिया खताची कमतरता भासणार आहे. येत्या दोन दिवसांत ५ हजार २०० क्विंटल युरिया पुन्हा जिल्ह्याला पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आढावा घेत असताना जिल्ह्यात खत व बियाण्यांच्या काळाबाजारावरदेखील चर्चा करण्यात आली. यावेळी अनेकदा शेतकऱ्यांची लूट केली जाते. खत काळ्याबाजारात विक्री केले जाते, अशा तक्रारी प्राप्त होत असतात. त्या तक्रारींची वेळीच दखल घेऊन सबंधित विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी विभागाने सज्ज राहावे, असे निर्देशही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवणकर यांनी दिलेत. विभागाने खत व बियाण्यांच्या तक्रारीकडे जातीने लक्ष द्यावे, निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)