शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! वैधता तपासूनच घ्या

By admin | Updated: March 11, 2015 01:20 IST

ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनिभज्ञता दिसून येते.

गोंदिया : ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनिभज्ञता दिसून येते. प्रत्येक वस्तूची कालर्मयादा ठरलेली असून सिलिंडरलाही ती आहे. ही बाब कुणीच गांभिर्याने घेत नाही. आॅईल कंपन्यांपासून वितरकांपर्यंत सर्वांचेच याकडे दुर्लक्ष होत आहे. पुरवठा विभागाच्याही अखत्यारितील ही बाब नाही. यामुळे ग्राहकांनी जागरूकता बाळगणे गरजेचे झाले आहे. दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच असेल याची शाश्वती नाही. या नियमांबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे काम गॅस कंपन्यांचे आहे. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. सिलिंडरला एक्सपायरी डेट असते, हे अनेकांना माहितीच नाही. गोंदिया शहरात गॅसधारकांची संख्या ५० हजारावर आहे. प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसेच ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे, याचाही अवधी त्या उत्पादनावर नोंदविलेला असतो. घरगुती आणि व्यावसायिक वापरात असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही असेच आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची एक्सपायरी डेट यालाच ‘ड्यु फॉर फिलिकल टेस्टिंग’ असे म्हणतात. परंतु, सर्वसामान्यांच्या भाषेत याला ‘एक्सपायरी डेट’ असेच म्हणतात. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुनर्तपासणी करून घेतल्यास भविष्यात होणारा अपघात टाळता येईल. मात्र, शहरी व ग्रामीण भागात याविषयी अनिभज्ञता असून जागृतीची गरज आहे. विशेष म्हणजे कोणीही गॅस वितरक याविषयी ग्राहकांना सांगत नसल्यामुळे यापासून बहुतांश ग्राहक अनभिज्ञ आहेत. यातूनच अनेक वेळा सिलींडरचा स्फोट किंवा गळती होण्याचे प्रकार घडतात. (जिल्हा प्रतिनिधी)अशी ओळखावी एक्सपायरी डेट सिलिंडरवर असलेल्या एक्सपायरी डेटची माहिती मिळावी याकरिता वर्षाची चार भागात विभागणी करण्यात आली आहे. महिन्याची ओळख होण्याकरिता ए, बी, सी, डी असे चार भाग केले जातात. एका भागात तीन महिन्यांचा समावेश आहे. जसे ए-१५ असल्यास २०१५ मध्ये जानेवारी ते मार्च मिहन्याच्या काळात या सिलिंडरची कालर्मयादा संपणार, असे समजावे.