शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

विटॅमिन ‘ए’चा बॅच नंबर वडेगाव केंद्राचाच

By admin | Updated: April 21, 2015 00:42 IST

वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाखेगाव उपकेंद्र परिसरात कालबाह्य औषधींचा साठा उघड्यावर फेकला आढळला.

बेवारस औषधी प्रकरण : अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी अंगलट येणारगोंदिया : वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लाखेगाव उपकेंद्र परिसरात कालबाह्य औषधींचा साठा उघड्यावर फेकला आढळला. या औषधापैकी विटॅमिन ‘ए’चा बॅच क्रमांक वडेगावला पुरविलेल्या औषधाच्या बॅचसोबत जुळल्याची माहिती तिरोडाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी. आर टेंभूर्णे यांनी दिली आहे. तिरोडा-वडेगाव मार्गावरील लाखेगाव जवळील विद्युत पारेषणच्या कार्यालयासमोर २०० ते ३०० औषधांच्या बाटल्या या ढिगाऱ्यात सापडल्या आहेत. या औषधांमध्ये सनसील १० मीली असून बॅच क्रं. एनएस २१२, एमएफजी डेट नोव्हेंबर १२ तर एक्सापरी डेट आॅक्टोंबर आहे. दुसरी औषध कॉन्सनट्रेटेड विटामीन ए सोल्यूशन आयपी ८५, १०० मिली असून बॅच क्रं. एलपी २०१९ एएल, निर्मिती नोव्हेंबर २०१२ तर एक्सपायरी डेट एप्रिल २०१४ आहे. त्याचप्रमाणे विटामेक्स ए सोल्यूशन बॅच क्र.एचएस १३६, एमएफजी डेट डिसेंबर २०१३, एक्सपायरी डेट नोव्हेंबर २०१४ आहे. तर क्लोरोक्विन फॉस्फेट सिरप आई पी, बॅच क्रमांक एलएचक्यू २००३ एएच, एमएफजी डेट जानेवरी १३ आणि जून १४ अशी आहे. सदर चारही प्रकारच्या औषधी बेवारसपणे उघड्यावर सापडली. मात्र आरोग्य विभागाने या प्रकाराकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले. शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात येणारे वीटामीन ए (अ जीवनसत्वाच्या) औषधी व बालकांसाठी असलेल्या जंतनाशक औषधी उघड्यावर फेकण्यात आल्या. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांनी या प्रकरणाची चौकशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभूर्णे यांच्याकडे दिली होती. या संदर्भात चौकशी थातू-मातूर होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आता जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्याचे ठरविले आहे. (तालुका प्रतिनिधी)दोन सदस्यीय समिती राहणारचौकशी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावरच सोपविल्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो असे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर व जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मदन पटले यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरीय समिती नेमा असे सांगितल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी आता अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व एक औषध निार्मण अधिकारी असे दोन सदस्यीय समिती नियुक्त करणार आहेत. ती समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.ती औषधी परिचराने उचलली१४ एप्रिलला उघड्यावर आढळलेली औषधी वडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचराने उचलल्याची विश्वसनिय माहिती आहे. ती औषधी कुणाच्या सांगण्यावररून चौकशीच्या पूर्वीच उचलली याची चौकशी होणे आवश्यक आहे. यातून या प्रकरणाचा छडा लागू शकतो.नोडल अधिकारी आलेवडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या लाखेगाव येथे उघड्यावर फेकलेल्या औषधाची माहिती मिळाल्यामुळे नोडल अधिकारी मेश्राम या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. बाल आरोग्य अभियानासंदर्भात पाहणी करण्यासाठी आलेले नोडल अधिकारी बालकांच्या या औषधीला घेऊन त्यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली आहे.