चारचाकी गाड्यांना प्रवेशबंदी : बाजारात वाढली वाहतुकीची कोंडी गोंदिया : अवघ्या चार दिवसांवर आलेल्या दिवाळीमुळे गोंदियाच्या बाजारात खरेदीसाठी एकच झुंबड उडत आहे. सर्व दुकानांमध्ये खचाखच गर्दी दिसून येत आहे. या वाढत्या गर्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहतुकीच्या कोंडी निर्माण होत आहे. यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने बाजारात चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी चार मुख्य मार्गांवर बॅरिकेट्स लावले आहेत. शिवाय वाहतूक पोलिसांची ड्यूटी लावून वाहतुकीची समस्या सोडविण्याची धडपड सुरू आहे.बाजारातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला बाजारात पाय ठेवायला जागा नाही. बाजारपातील रस्ते अगोदरच अरूंद असून गर्दी असताना यात वाहनांमुळे जास्त अडसर निर्माण होत आहे. त्यातही चारचाकी वाहनांमुळे रस्ताच जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतुकीची ही कोंडी सोडविण्यासाठी व नागरिकांना ट्राफीक जामच्या समस्येपासून दिलासा मिळावा या दृष्टीने वाहतूक नियंत्रण विभागाने बाजारातील मुख्य मार्गांवर बॅरिकेट्स लावले आहेत. येथील जैन मंदिर मार्ग, श्री टॉकीज मार्ग, दुर्गा चौक मार्ग व पोलीस स्टेशन मार्ग हे मुख्य मार्ग पुढे गोरेलाल चौकात येत असून हा मुख्य बाजार परिसर आहे. येथे आजघडीला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. वाहनांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. याकरिता वाहतूक शाखेने जैन मंदिरासमोर, लकी स्टोर्ससमोर, दुर्गा चौकात व आमदार अग्रवाल यांच्या घरासमोर बॅरिकेट्स लावले आहेत. या बॅरिकेट्सच्या आत चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)अग्रसेन भवन परिसरात चारचाकी वाहनांना पार्र्किं गबाजारात चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करून वाहनांना अग्रसेन भवन परिसरात पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे चारचाकी वाहनातून खरेदीसाठी येणारे येथे वाहन पार्क करून आत बाजारात प्रवेश करीत आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या या नियोजनामुळे बाजारातील वाहतुकीची कोंडी काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. प्रवेशबंदी असतानाही चारचाकींचा प्रवेश चारचाकींना प्रवेशबंदी करण्यासाठी बॅरिकेट्स लावून वाहतूक पोलिसही तैनात ठेवले आहे. असे असतानाही चारचाकी वाहनांचा बाजारात प्रवेश सुरूच असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. हा प्रकार वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत घडत आहे. मात्र अशा चारचाकींवर कोणतीच कारवाई होत नसल्याने दुचाकी चालकांत मात्र रोष दिसून येत आहे.
वाहतुकीच्या कोंडीवर ‘बॅरिकेट्स’चा तोडगा
By admin | Updated: November 7, 2015 01:46 IST