शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्याने केले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:21 IST

यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैरान केले आहे.

ठळक मुद्देनवतपा चांगलाच तापला : सर्वाधिक ४५.५ अंशाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सुर्यदेव चांगलेच खवळले असतानाच नवतपाही कधी नव्हे तसा तापला. २५ मेपासून सुरू झालेल्या या नवतपात यंदाची सर्वाधीक ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे, नवतपात एक-दोनदा बरसलेल्या सरींमुळे आणखीच अडचण वाढली असून उकाडा व उमसने हैरान केले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.उन्हाळ््यातील चार महिने तसेही असह्य असतात. मात्र या चार महिन्यांत जेवढा उन्हाळा तापत नाही तेवढे उन्ह नऊ दिवसांत पडते व त्यालाच नवताप म्हणतात. या नऊ दिवसांत सुर्य पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच नवतपा म्हणताच भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते.यंदा २५ जून पासून नवतपा सुरू झाला व नावाप्रमाणे चांगलाच तळपल्याचेही दिसले. यंदाच्या उन्हाळ््यातील सर्वाधीत ४५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद याच नवतपात २८ जून रोजी घेण्यात आली. यावरून यंदाचा नवतपा कसा तळपला असेल याची प्रचिती येते.विशेष म्हणजे, नवतपादरम्यान एक-दोनदा पाऊस बरसला व त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे आणखीच त्रास वाढला असून उकाडा व सोबतच उमसने सर्वांना हैरान करून सोडले आहे.पावसानंतर वातावरणात गारवा नव्हे तर उमस वाढली असून अंग चिपचिप होत आहे. २ जून रोजी नवतपा संपणार असून पावसाचा काही थांगपता नसल्याने या उन्हापासून सध्यातरी सुटका दिसत नाही. अशात सर्वांच्या नजरा अकाशाकडे लागल्या असून एकदाचा पाऊस बरसून उकाड्यापासून सुटका व्हावी याची सर्वच वाट बघत आहेत.पारा ४० अंश पारचनवतपाच्या पहिल्याच दिवशी २५ जून रोजी जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली. त्यानंतर २८ जून रोजी ४५.५ अंश सेल्सिअस नंद घेण्यात आली. त्यानंतर पार कधी वर तर कधी खाली होत गेला. मात्र सातत्याने ४० अंश सेल्सिअसवरच नोंद घेतली जात आहे. २ जून रोजी नवतपा संपणार असून त्यानंतरही तापमान काही खाली येणार असल्याचे दिसत नाही. जोपर्यंत संततधार पाऊस बरसणार नाही तोपर्यंत या उकाड्यापासून सुटका नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान