शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

बापरे...२८ हजार नागरिकांनी केले नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतर काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.

ठळक मुद्दे५२ लाख ६१ लाख रुपयांचा दंड वसूल : १४८ जणांवर फौजदारी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासन आणि प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, गर्दी टाळणे, निर्धारित वेळेत दुकाने सुरू ठेवणे यासाठी नियम तयार केले होते.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यातंर्गत मागील सहा महिन्यात एकूण २७ हजार ९०० नागरिकांवर कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यानंतर काहीजण या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.यात प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर न करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदीचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मागील सहा महिन्यात या विरोधात धडक मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ हजार ९०० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन ५२ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १४८ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे नियमांचे पालन करणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. कोविड संसर्गाच्या काळात दंडत्मक कारवाईतून प्रशासनाला सुध्दा चांगला महसूल प्राप्त झाला आहे.आठ दिवसात ७६४ जणांवर कारवाईसप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ उंचावल्याने नियम अधिक कठोर करीत राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले. यातंर्गत मागील आठ दिवसांच्या कालावधी ७६४ जणांवर कारवाई करुन ३ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर व्यावसायीक प्रतिष्ठाने आणि बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ११ हजार ७५ जणांवर कारवाई करुन ११ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कोविडची माहिती लपविणे पडले महागातकोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची आरोग्य विभाग आणि नगर परिषदेला माहिती देणे अनिवार्य आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी सुध्दा याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र बरेच रुग्ण याची माहिती देत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा माहिती लपविणाऱ्या ८० रुग्णांना प्रशासनाने नोटीस बजावून १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून यापैकी ४ जणांनी दंडाची रक्कम भरली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या