शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेले ई-रिक्षा धावतात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:22 IST

महाराष्टÑातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा गोंदियात सर्रास चालविले जात आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभागाला येतात धमक्या : क्रमांकाविनाच वाहनातून प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑातील नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती हे ठिकाण वगळता सर्वच ठिकाणी बंदी असलेले ई-रिक्षा गोंदियात सर्रास चालविले जात आहे. बंदी असलेल्या या वाहनांना जिल्ह्यातील रस्त्यांवर धावताना परिवहन विभागाच्या अधिकाºयांना हे वाहन आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ५० ई-रिक्षा बिनधास्त धावत असल्याची माहिती आहे.बॅटरीवर चालणारे ई-रिक्षा दिल्लीतील प्रकरणाने गाजले. त्यानंतरही महाराष्टÑात या ई-रिक्षाला बंदी होती. त्यानंतर प्रायोगीक तत्वावर नागपूर, वर्धा, अकोला, लातूर व अमरावती या ठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात आले.परंतु हे ठिकाण वगळले तर अख्या महाराष्टÑात ई-रिक्षाला बंदी असताना गोंदिया व तिरोडा येथे ई-रिक्षा विक्रीची दुकाने थाटून हे वाहन विक्री केले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला ५० ई-रिक्षा धावत असल्याची माहिती परिवहन विभागामार्फत मिळाली.महाराष्टÑ शासनाची या ई-रिक्षांना मंजूरी नाही. त्यांची नोंदणी झाली नाही. तरिही क्रमांक नसताना रस्त्यावर बिनधास्तपणे हे वाहन चालविले जात आहे. या वाहनचालकांनी अपघात करून वाहन पळवून नेले तर त्यांना शोधणे अत्यंत कठिण होणार आहे. अनधिकृतपणे हे रिक्षा गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांवर बिनधास्तपणे धावत आहेत. यावर कारवाई होणार आहे.तसेच रस्त्यावर विनाक्रमांक धावणाºया गोंदियात एक तर तिरोड्यात दुसरा ई-रिक्षा जप्त करण्यात आले आहे. आता आणखी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.परिवहन विभागाची पोलिसांत तक्रारबंदी असलेले ई-रिक्षा जिल्ह्यात धावत असल्याने दोन ई-रिक्षांवर कारवाई करून एक वाहन तिरोडा पोलीस ठाण्यात तर दुसरे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लावण्यात आले आहे. जप्त केलेल्या त्या वाहनांना सोडण्यासाठी नागपूर येथून परिवहन विभागाचे कर्मचारी मांडवेकर यांना मंगळवारी फोन आला होता. ते वाहन न सोडल्यास तुम्हाला व तुमच्या अधिकाºयांना ठार करू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार परिवहन विभागाने शहर पाोलिसांकडे केली आहे.