शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

दुर्मिळ वृक्षांच्या बियाण्यांची तयार करणार बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:36 IST

विदर्भात वनांचे प्रमाण सर्वाधिक असून यात अनेक महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वनस्पती आणि मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्षांच्या प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देनर्सरी तयार करुन संवर्धन : देशी प्रजातींना प्राधान्य

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात वनांचे प्रमाण सर्वाधिक असून यात अनेक महत्त्वपूर्ण औषधीयुक्त वनस्पती आणि मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वृक्षांच्या प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या दुर्मिळ वृक्षांच्या बियाण्यांची बँक आणि नर्सरी तयार करुन त्यांचे जतन करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.जुन्या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी ‘वृक्ष पेन्शन’ योजना राबविली. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. जुन्या वृक्षांचे संगोपन करणाऱ्या जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना पेन्शन रक्कमेचे वाटप नुकतेच करण्यात आले. या योजनेमुळे ७० ते ८० वर्षे जुन्या वृक्षांचे संर्वधन करण्यास मदत झाली. शेताच्या धुºयावरील अथवा रस्त्यालगत असलेल्या जुन्या वृक्षांचे संगोपन केल्यास भविष्यात त्याचा आर्थिक लाभ मिळेल अशी कल्पना सुद्धा शेतकºयांनी कधी केली नसेल. मात्र वृक्ष पेशंन योजनेमुळे त्यांना आर्थिक मदत झाली. गोंदिया जिल्ह्यात वनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या वनांमध्ये अनेक मौल्यवान व औषधीयुक्त वृक्षांचा समावेश आहे. मात्र या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने ती दुर्मिळ होत चालली आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करुन ते भावी पिढीला देखील उपयोगी पडावी, यासाठी या वृक्षांच्या बियाणांचे संकलन करुन त्यांची बँक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या मदतीने दोन एकरवर या दुर्मिळ बियाण्यांची तीन रोपवाटिका तयार करुन लागवड करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा प्रशासन देणार आहे. बियाण्यांच्या संकलनाची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागावर सोपविण्यात आली आहे. दुर्मिळ बियाण्यांची बँक तयार केल्याने अनेक मौल्यवान वृक्ष व औषधयुक्त वनस्पतीचे जतन करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा गोंदिया हा विदर्भातील एकमेव जिल्हा आहे.रोपवाटिका व बागेत केवळ देशीच वृक्षअलीकडे नागरिकांचा व सरकारी कार्यालयांचा कल आकर्षक वाटणाºया विदेशी वृक्षांच्या लागवडीकडे आहे.यामुळे देशी वृक्षांचे संवर्धन आणि संगोपनाकडे दुर्लक्ष झाले आहे. हीच बाब हेरून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील बगिचे, सार्वजनिक बगिच्यात आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या नसर्रीत सुद्धा देशी प्रजातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. विदेशी प्रजातीच्या रोपट्यांची लागवड न करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.१३५ दुर्मिळ वृक्षांची यादी तयारसालेकसा तालुक्यातील दलदल कुही भागात अनेक दुर्मिळ वृक्ष वनस्पती आहेत. तसेच दुर्मिळ होत चाललेल्या करु, पिवळा पळस यासारख्या १३५ वृक्षांच्या नावाची यादी जिल्हा प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी संस्थानी तयार केली आहे. या वृक्षांच्या बियाणांचे संकलन करुन त्यांची नर्सरी तयार करण्यात येणार आहे.जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे वरदान मिळाले आहे. यात अनेक मौल्यवान वृक्ष असून त्यांचे संगोपन करण्यासाठी दुर्मिळ बियाण्यांची बँक आणि नर्सरी तयारी केली जाणार आहे.- डॉ.अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी गोंदिया.