शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बँकेचे व्यवहार खोळंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:57 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.

ठळक मुद्देग्रामीण भागाला फटका : बीएसएनएलचा भोंगळ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे गुरूवारी (दि.३१) शहरासह ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना बँका, शासकीय कार्यालयांना सुध्दा याचा फटका बसला. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते.केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने डिजीटल इंडियाचा नारा दिला. बहुतेक व्यवहार त्यामुळे आॅनलाईन केले जाते. शासकीय कार्यालय असो वा बँका आणि खासगी कार्यालयाचे कामकाज सुध्दा इंटरनेट सेवेवर अवलंबून आहेत. तर मोबाईल ही नागरिकांची आवश्यक गरज झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाल्यास सर्व व्यवहारांना ब्रेक लागत असल्याचे चित्र पाहयला मिळते. याचा अनुभव गोंदिया जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बुधवार व गुरूवारी आला. प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास गोंदिया-तुमसर सुमारास बीएसएनएलचे आॅपटीकल केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली होती. बुधवारी सायंकाळपासून बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे मोबाईल काम करीत नव्हते.त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास बीएसएनएलची सेवा पुर्ववत सुरू झाली. मात्र ती सुध्दा मध्ये मध्ये बंद पडत असल्याने शहरातील सर्व बँकांची लिंक फेल झाली होती. त्यामुळे बँकाचे आर्थिक व्यवहार सुध्दा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.शहरासह आमगाव व गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इंटरनेटसेवा प्रभावित झाली होती. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयाकडे धाव घेत यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा केली असता ग्रामीण भागाचे इंचार्ज बैठकीसाठी गेल्याचे सांगितले.गोंदियाचे काम भंडाºयावरुनगोंदिया जिल्ह्याची निर्मिती होवून २० वर्षांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही येथील बीएसएनएल कार्यालयाचा कारभार भंडाºयावरुन सुरू आहे. केवळ तांत्रिक कामेच गोंदिया येथील कार्यालयातून होत आहे. त्यामुळे बरेचदा सेवेत बिघाड आल्यानंतर दुरूस्ती होण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.बांधकामाची माहिती नाहीबीएसएनएलच्या एका कर्मचाºयांने दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या रस्ता बांधकामाची माहिती या विभागाला मिळत नाही. रस्त्याच्या खोदकामादरम्यान इंटरनेटचे आॅपटीकल केबल तुटत असल्याने सेवा ठप्प होते. संबंधित विभागाने याची वेळीच माहिती दिल्यास उपाय योजना करण्यास मदत होईल असे सांगितले.