शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:16 IST

युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला.

ठळक मुद्देकर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध : बँकेसमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : युनायटेड फोरम बँक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने ग्राहक विरोधी बँकिंग धोरण व वाढीव सेवा शुल्काचा विरोध करीत आपल्या मागण्यांसाठी बँक कर्मचाºयांनी मंगळवारी (दि.२२) एक दिवसीय संप पुकारला.या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे १० लाख अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आहे.ग्राहक विरोधी बँकींग धोरण, थकित कर्ज राईट आॅफ करणे, वाढीव सेवा शुल्काचा युनियन विरोध करीत आहे. तसेच थकीत कर्ज वसुलीसाठी संसदीय समितीच्या सुधारणा लागू करा, थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करा, प्रस्तावीत एफआरडीआय बील मागे घ्या, बँक बोर्ड ब्युरो बरखास्त करा, बँकांतून सर्व श्रेणीत पुरेशी नोकर भरती करा, कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करण्यात याव्या. या मागण्यांसाठी युनियनने हा संप पुकारला होता.संपांतर्गत काही बँकातील अधिकारी व कर्मचारी मंगळवारी (दि.२२) सकाळी येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर एकत्रीत आले. याप्रसंगी युनियनच्या पदाधिकाºयांनी उपस्थितांना संपाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासन व बँक विरोधी धोरणांच्या विरोधात नारेबाजी केली.याप्रसंगी युुनियनचे जिल्हाध्यक्ष भास्कर राव, सचिव चंद्र प्रकाश, पंकज शारणागत, विजय ठवरे, निलेश चौधरी, ओमप्रकाश बुरडे, प्रिती चित्रीव, स्वाती शुक्ला, रिता सुखदेवे, देवीसींग सयाम, राकेश कोल्हे, मिलींद ठक्कर, प्रवीण बिसेन, छटवानी, दीपक बडवाईक, सुशांत शहारे, राजू कदम, पुंडलीक उके, पृथ्वीराज भैसारे, गणेश डडूरे, प्रमोद नाडेवार, राहूल लेहूरे, धर्मराज, शशी पटेल, कपिल मिश्रा, एस.एस.लिल्हारे, मोरेश्वर कुथे, मयाराम राऊत, अर्जुनसिंग ठाकूर, अनिल सुर्यवंशी, धनंजय मेश्राम, पुनम कनोजिया, रेखा धकाते, राजश्री आंबेडारे उपस्थित होते.