शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 20:48 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनात सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनानंतर बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि.३०) संप पुकारला आहे.

ठळक मुद्देविविध मागण्या : स्टेट बँकेसमोर जोरदार निदर्शने व नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनात सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनानंतर बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि.३०) संप पुकारला आहे.सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या गोंदियातील मुख्य शाखेसमोर एकत्र येवून जोरदार निदर्शने व नारेबाजी केली. आपल्या मागण्यांसाठी देशभरातील १० लाखांपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकारी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. आयबीए व शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. वेतन वाढ व इतर मागण्यांबाबत आयबीएद्वारे विलंब केला जात आहे. तसेच अन्यायपूर्ण कार्यवाही केली जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. या कार्यप्रणालीचा निषेध करण्यात आला. सरकारने मागण्या मंजुर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे. याप्रसंगी चंद्रप्रकाश रूहिया, पंकज शरणागत, विजय ठवरे, ओमप्रकाश बुरडे, एल.के. सिंग आदी नेत्यांनी संपात सहभागी कर्मचारी-अधिकाºयांना संबोधित केले. नवतपाच्या वाढत्या उष्णतेतही एक तासापर्यंत उन्हात नारेबाजी करीत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला.हा संप ३० व ३१ मे २०१८ या दोन दिवसांसाठी पुकारण्यात आला आहे. यात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सर्व बँक कर्मचारी सहभागी झाले आहेत.जिल्हाध्यक्ष भास्कर राव, सचिव चंद्रप्रकाश रूहिया, पंकज शरणागत, विजय ठवरे, ओमप्रकाश बुरडे, एल.के. सिंग तसेच श्याम घाटे, अर्जुन ठाकूर, गणेश डडुरे, अनिल वैद्य, अश्विन राऊत, पृथ्वीराज भैसारे, राजू कदम, पी.बी. हटवार, राकेश कोल्हे आदी अनेक कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते.