शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा झाकण्यावर बंदी घाला

By admin | Updated: September 13, 2014 02:01 IST

डोळे वगळून संपूर्ण चेहऱ्याला कापड बांधून फिरणे हे संरक्षणाच्या दृष्टीने योग्य असले तरी याचा दुरूपयोग होऊ लागला आहे.

काचेवानी : डोळे वगळून संपूर्ण चेहऱ्याला कापड बांधून फिरणे हे संरक्षणाच्या दृष्टीने योग्य असले तरी याचा दुरूपयोग होऊ लागला आहे. पोलीस विभागाच्या शिफारसीने कायदा करून डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय तोंडाला रूमाल बांधणाऱ्या युवावर्गावर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तिरोडा ते गंगाझरी या बसमार्गावरील स्थानक व काचेवानी, तिरोडा आणि गंगाझरी या रेल्वे स्थानकांवरून गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही प्रेमी युगुल जंगल भागाकडे जावून मौजमस्ती करीत असल्याच्या घटना नागरिकांच्या तोंडावर आहेत. तिरोडा ते गंगाझरी बसमार्गाच्या उत्तर दिशेला सगळीकडे जंगल परिसर असून या जंगलाचा गैरफायदा अधिकाधिक प्रेमी युगुल घेतात. यातच काही लोक लैंगिक चाळे करण्यासाठी तिकडे जात असल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले आहे. जंगल परिसरात जाणारे पन्नास टक्के युवक तोंडाला कापड बांधलेले असतात. तर स्त्रिया किंवा मुलींचे कापड बांधण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. तिरोडा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून अदानी वीज प्रकल्पाचे काम सुरू असून या ठिकाणी दुरदुरचे व अन्य प्रांताचे मजूर व कर्मचारी कामावर आहेत. त्यामुळे काही लोभी प्रवृत्तींच्या महिला आणि कुमारिका त्यांना बळी पडत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त करीत आहेत. काचेवानी, तिरोडा आणि एकोडी येथे काही अनोळखी युवती तोंडाला कापड बांधलेल्या (फक्त डोळे दिसतात) रेल्वे किंवा बसने उतरतात व मोबाईलने संपर्क करतात. यानंतर सांगितलेल्या जागेवर येऊन त्या युवकासह निघून जात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही दिवसांपूर्वी बरबसपुरा बसस्थानकावरसुध्दा दोन मुली येऊन कमीत कमी दोन ते तीन तास बसून राहिल्या असल्याचे येथील पानटपरी चालकांनी सांगितले होते. यासंब्ांधी काही पानटपरी चालकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दिवसभर डोळे मिटून तर राहात नाही. मात्र ते निश्चित कोण असणार, हेसुध्दा सांगू शकत नाही. तोंडाला झाकून वावरणाऱ्या मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मोबाईलव्दारे वास्तविकता कळत नाही आणि तोंडाला कापड बांधले असल्याने ओळखता येत नाही, ही गंभीर समस्या आहे. गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याचे हेही प्रमुख कारण आहे. तिरोड्याकडून डाकराम/सुकडी, बोदलकसा, मंगेझरी आणि निमगाव/इंदोराकडे, काचेवानी, एकोडी व दांडेगावकडून काचेवानी, धामनेवाडा, जुनेवानी आणि संग्रामपूर जंगलात ते भ्रमणास जात असतात.