शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:31 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन बाजार समितीमध्ये कार्यरत हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून(दि.२८) काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : सातही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन बाजार समितीमध्ये कार्यरत हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून(दि.२८) काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.जिल्ह्यात गोंदिया, आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा व गोरेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून या बाजार समित्यांमधून धानासह इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. जवळपास खरीप हंगामा दरम्यान दररोज हजार क्विंटलवर धानाची खरेदी विक्रीे केली जाते. या सातही बाजार समित्यामंध्ये हंगामी व रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाºयांनी शासकीय सेवेत सामावून घेवून त्यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी सुविधा देण्याची मागणी केली होती. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे कर्मचाºयांनी २८ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र यानंतरही शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे हंगामी व रोजंदारी असे ४०० वर कर्मचारी गुरूवारपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. यामुळे लाखो रुपयांचे व्यवहार सुध्दा खोळंबले होते. दरम्यान कर्मचाºयांच्या या आंदोलनाचा फटका बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना बसला. त्यांना आल्या पावलीच परत जावे लागले.आंदोलनात सहभागी कर्मचाºयांनी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करुन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधक यांना दिले. जोपर्यंत मागण्यांपूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार अशी भूमिका या कर्मचाºयांनी घेतली असल्याने शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अर्जुनी मोरगाव बाजार समितीत प्रभावशेतकºयांच्या शेतमामाला योग्य भाव मिळावा. शेतकºयांची व्यापाºयांमार्फत लुबाडणूक होऊ नये म्हणून बाजार समिती महत्वाची भूमिका बजावीत आहे. सदर बाजार समितीमध्ये ८ कर्मचारी स्थायी असून ३६ कर्मचारी रोजंदारी म्हणून कार्यरत आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयीन कामकाज पूर्णत: ठप्प पडले आहे. रोजंदारी कर्मचारी शेतमाल तपासणी नाक्यावर तैनात असून आपली कामगिरी बजावताना दिसून आले. बाजार समितीच्या कार्यालयीन कामावर सुध्दा कर्मचाºयांच्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड