अर्जुनी/मोरगाव : बांबू कामगारांना बांबूचा पुरवठा करण्याचे अनेकदा आश्वासन देऊनही वन विभागाचे अधिकारी कामगारांची दिशाभूल करीत आहेत. येत्या पंधरवाड्यात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर बांबू मजदूर संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा उपवनसरंक्षक गोंदिया यांना एका निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.बांबू मजूर संघटनेचे राष्ट्रीय महासचिव दिलवरभाई यांच्या नेतृत्वात वनाधिकाऱ्यांच्या अनेकदा भेटी घेण्यात आल्या. बांबू हा बांबू कामगारांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. तो त्यांना नियमितपणे मिळावयास हवा. ही बाब त्यांना पटवून देण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. परंतु बांबूचा पुरवठा कधी होईल ते सागणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बांबू कामगारांना आॅक्टोबर महिन्यापासून पुरवठा होणे अपेक्षित असते. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अद्यापही बांबूचा पुरवठा झालेला नाही. नको ते कारण सांगूण अधिकारी कामगारांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत. नवीन वह्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळात दिलवरभाई, हक्कीम गेडाम, भगवान नंदेश्वर, सिध्दार्थ उके, भीमराव राऊत, नंदकुमार कांबळे, शैलेश तागडे, मोरेश्वर बडोले, दयाल राऊत व बादल राऊत उपस्थित होते.
बांबू कामगारांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Updated: November 19, 2014 22:51 IST