शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

बाल महोत्सवात अवतरले ‘बाजीराव मस्तानी’

By admin | Updated: March 5, 2016 01:53 IST

विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी देण्यासाठी सोमवारी लोकमत बालविकास मंचच्या वतीने गोंदियात ....

गोंदिया : विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी देण्यासाठी सोमवारी लोकमत बालविकास मंचच्या वतीने गोंदियात ‘बाल महोत्सवा’चे आयोजन केले होते. समूह नृत्य, एकल नृत्य तसेच जनजागृतीपर पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशही दिला. या महोत्सवातील सर्वाधिक नृत्य स्पर्धकांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गीतांवर जास्तीत जास्त नृत्य सादर केल्याने या महोत्सवात बाजीराम मस्तानीच अवतरल्याचा भास प्रेक्षकांना होत होता. प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी त्यांच्यात एकच पैज लागल्याचे दिसून आले. सदर बाल महोत्सव बी.बी. पब्लिक स्कूल येथे थाटात साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला. ज्यात चंचलबेन मनिभाई पटेल हायस्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, लिटील फ्लॉवर कॉन्व्हेंट, शारदा कॉन्व्हेंट, सेंट झेव्हियर्स हायस्कूल, संस्कार कॉन्व्हेंट, एक्युट पब्लिक स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, महर्षी विद्यामंदिर, मनोहर म्युनिसिपल स्कूल, विवेक मंदिर, बी.बी. पब्लिक स्कूल गोंदिया व अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती विद्यालय यासारख्या विद्यालयांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती देवी व स्व. जवाहरलाल दर्जा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, रक्त संक्रमन अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, एस.एस. कोचिंग क्लासेसचे संचालक संजय शेंडे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, लोकमत इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजिका दिव्या भगत, अ‍ॅड. सुनीता पिंचा, बी.बी. पब्लिक स्कूलचे संचालक भूपेंद्र वैद्य, मुख्याध्यापिका एम.एम. शेख मंचावर उपस्थित होते.स्वागत गीताद्वारे बाल महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांची समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यात वर्ग एक ते पाच साठी ‘अ’ गट व वर्ग सहा ते नऊ साठी ‘ब’ असे दोन गट पाडण्यात आले होते. समूह नृत्य स्पर्धेसाठी स्पर्धकांनी चांगलीच तयारी करून आल्याचे त्यांच्या सादरीकरणावरून दिसून आले. एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करण्यात आले. यानंतर नाटिका स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. स्वच्छ भारत या विषयावर सेंट झेव्हियर्सच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत स्वच्छतेची जाणीव व महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शारदा कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आश्रीत नाटिका सादर केली. ज्यात व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम व त्यामुळे मानवी जीवन कसे नष्ट होते यावर प्रबोधनपर नाटिका सादर करून सामाजिक संदेश दिला. स्वच्छ भारत या विषयावर अतिसुंदर नाटिका बी.बी. पब्लिक स्कूलचे सादर केली. यात गांधी युग दाखवून महात्मा गांधीद्वारे दिलेल्या स्वच्छताविषयक संदेशांना मांडण्याचा प्रयत्न केला. अशा नाटिकेतून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. शेवटी एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. एकल नृत्य स्पर्धा सुरू होण्याआधी बालके एकल नृत्याचा सराव करताना दिसून आले. यात सहभागी झालेल्या बालकांनी आपल्या व्ययक्तिक कलागुणांना उजाळा दिला. तर एक्युट पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी गौरी बेले हिने तेजाब चित्रपटाच्या ‘एक-दो-तीन...’ या गीतावर बेभान होऊन नृत्य केले. तिच्या या नृत्यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. प्रास्ताविक जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार व संचालन रामभरूस चक्रवर्ती यांनी केले. आभार जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी मानले. (प्रतिनिधी)