शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण मागे

By admin | Updated: January 4, 2017 01:05 IST

पिंपळगाव येथे हनुमान वॉर्ड क्र. २ दलीत वस्ती सिमेंट रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

अतिक्रमण हटविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन चिचाळ : पिंपळगाव येथे हनुमान वॉर्ड क्र. २ दलीत वस्ती सिमेंट रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याच्याविरोधात अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांनी आठ दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन देवून त्यांचे उपोषण सोडले. पिंपळगाव गावठाण हद्दीतील दलीत वस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य मार्गावर संतोष सुखदेवे यांचे शौचालय, भैरव वाहने यांच्या घराचा वऱ्हांडा व टिनपत्रे, रामजी मेश्राम यांच्या घराची पायरी व टिनपत्रे रस्त्यावर आल्याने बैलबंडीला अडथळा निर्माण होत होता. याविरूध्द अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरु केले. तहसीलदार एस. के. वासनिक, खंडविकास अधिकारी बी. वाय. निमसरकार, मुनिर शेख, ठाणेदार अजाबराव नेवारी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून चौकशी केली. तहसीलदार यांनी ९ डिसेंबरपर्यंत अतिक्रमण काढण्याचे नोटीस देवून पूर्ववत सुचना देण्याचे ठरविले. गैरअर्जदाराने अतिक्रमण न काढल्यास १२ डिसेंबरला जेसीबीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन तात्काळ ग्रामपंचायतला काढण्यास सांगितले. व मेश्राम यांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी ठाणेदार अजाबराव नेवारे सरपंच सुषमा येळणे, उपसरपंच अमित गाडेकर, अतूल कुर्झेकर, बंडू येळणे, कल्पना येळणे, शारदा गाडेकर, मंदा सेलोकर, राजकुमार येळणे, सुधाकर पंचभाई, मंदा लोखंडे, चित्रलेखा सुखदेवे, सुरेखा सुखदेवे, मनिषा मेश्राम, सुलोचना दहिवले, दुर्गा दहिवले, सकवार उके, राजकुमार सुखदेवे, दादाराव लोखंडे, नवनाथ मेश्राम, शिवनाथ मेश्राम, जितेंद्र सुखदेवे, धर्मदास दहिवले व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)