शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने बेड्यातून बंधमुक्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:42 IST

हजारो वर्षे या देशातील शोषित पिडीत, दलित आदिवासी बहूजन व महिलांना गुलामीच्या बेड्यातून बंधमुक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून समता, बंधूता, न्याय, हक्क, स्वातंत्र्य देऊन भारमुक्त केले.

ठळक मुद्देउषाकिरण आत्राम : आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून मांडले मत

ऑनलाईन लोकमतसालेकसा : हजारो वर्षे या देशातील शोषित पिडीत, दलित आदिवासी बहूजन व महिलांना गुलामीच्या बेड्यातून बंधमुक्त करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून समता, बंधूता, न्याय, हक्क, स्वातंत्र्य देऊन भारमुक्त केले. अशा महामानवाला समाज कधीच विसरु शकत नाही. अशा विश्वास राज्यातील प्रसिद्ध लेखिका व कवियित्री उषाकिरण आत्राम यांनी व्यक्त केला.त्या दुसरे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या बोलत होत्या.राज्यस्तरीय दुसरे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संममेलन खोपरीडोमा येथे घेण्यात आले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान लेखिका व कथाकार से.नि.राजपत्रित अधिकारी उषाकिरण आत्राम यांना मिळाला. या बहुमानाबद्दल त्यांनी स्वत:ला आनंदीत व भाग्यवान मानले. त्यांची लोकमत प्रतिनिधीने विशेष मुलाखात घेतली. या मुलाखतीत त्यांनी मुक्त कंठाने बाबासाहेबांच्या कामगिरीची स्तुती केली व त्यांनी केलेल्या कामांना युगानुयुगे भारतीय समाजच नाही तर विश्व स्तरावर सदैव स्मरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उषाकिरण आत्राम म्हणाल्या की, स्त्रीयांसाठी गांभीर्याने विचार करीत बाबासाहेबांनी त्यांच्या मानवी हक्कासाठी स्वतंत्र साहित्य कोडबिल तयार केले आणि या विधेयकाला पंडीत नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या धुरंधर लोकांनी कठोर विरोध दर्शविला. व विधेयक पारित न करता ते परत पाठविले होते. यासाठी बाबासाहेबांना कडवा विरोध पत्करावा लागला होता. शेवटी त्यांनी महिला विधेयकास मान्यता न मिळाल्याने निराशा होवून केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा २६ सप्टेंबर १९५१ रोजी दिला.महिलांचे आत्मसम्मान, न्याय हक्कासाठी त्यांच्या स्वातंत्र्य व मानवी हक्कासाठी मंत्रीपदाचा त्याग करणारा हा महामानव बापापेक्षाही मोठा आहे, म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे भारतातल्या सर्व स्तरातील महिलांनी आभार मानायला पाहिजे. त्यांचे ऋण त्यांनी सदैव आठवण ठेवून विसरता कामा नये. त्यामुळे आम्ही आज सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करुन बंधमुक्त होऊन आकाश झेप घेत आहोत असे सांगितले.आंबेडकरी साहित्यांचे मातृकोष आंबेडकर विचारधारा आहे. आंबेडकरी साहित्य हे शोषित, पिडीत्यांच्या वेदनेचे साहित्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वास्तवाचे जिवंत चित्र उभे करणारे ऊर्जावान आणि सर्वांनाच मार्गदर्शक असे साहित्य असल्याचे आत्राम यांनी सांगितले.