खजरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथे ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमांतर्गत पारंपरिक बियाणे व पारंपरिक पक्वान्न प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. परसोडीच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेत गोळा केलेल्या पारंपारिक कडधान्ये व बियाण्यांच्या प्रदर्शनातून जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना झोले पाटील, प्रमुख पाहुणे माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, सभापती निर्मला उके, तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष देव बनकर, सरपंच रंजना कठाणे, सरपंच भिवराज शिवणकर, विनायक कापगते, वंदना डोंगरवार, ए.व्ही. मेश्राम उपस्थित होते.आपल्या गाव परिसरात मोठ्या प्रमाणात वन उपज उपलब्ध आहेत. भरपूर प्रमाणात जैविविधतेनुसार रानभाज्या, कंदमुळे, रानफुले अजूनही आहेत. परंतु बहुतेकांना त्याचा परिचय नसून त्यांचा पोषण मुुल्यांचीही किंमत कळलेली नाही. नवनवीन आजार वाढत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण करून स्वत:च्या हक्क अधिकाराप्रती जागृत होणे गरजेचे असल्याचे जनुक कोष प्रकल्प समन्वयक सुधीर धकाते म्हणाले. मुलांच्या बौध्दिक व शारीरिक विकासाकरिता पालकांनी पारंपारिक आहार व व्यंजने दैनंदिन जीवनात वापर करण्याची सक्ती न केल्यामुळे आपले ज्ञान, कौशल्य नव्या पिढीला न दिल्यामुळे व आपल जीवन शैलीचे महत्व शिक्षणाव्दारे न दिल्यामुळे आजच्या पिढीचे जीवन अस्थिर व परावलंबी झाले आहे. त्यांचे भविष्य आज धोक्यात आले आहेत. उद्घाटक डॉ. शांतिलाल कोठारी यांनी लाखोळी डाळ व मोहफुल विषयी महत्व सांगितले. उपस्थित महिला, शेतकरी यांना जैवविविधता समिती स्थापनेची माहिती दिलीे. प्रस्तावना सुधीर धकाते यांनी केली. संचालन देवेंद्र राऊत यांनी मानले. व्यंजनाच्या पाककृतीच्या नोंदी व विश्लेषण मृणाली खोब्रागडे, अस्मिता धोंडगे, जितेंद्र खोब्रागडे, महादेव कोरे व ज्ञानेश्वर बनकर यांनी केले. आभार ओमप्रकाश फुंडे यांनी केले. यशस्वीतेसाठी जि.प. वरिष्ठ प्राथमिक परसोडी सडक येथील शिक्षक, विद्यार्थी तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)जिल्ह्यात आढळतात ही कडधान्येगोंदिया जिल्ह्यातील कृषी जैवविवधता जपवणूक केलेले पारंपारिक धान, एकलोम्बी, हलवा बासाभिरा, कालीकमो, लुचई, दुबराज, हिरानक्की, हलबी, जवस, कुळथा, काळा, पोपट, लाख, लाखोरी, चनुली, चवळी, मसुर, रानकंद, भरसकांदा, गांगर्याकांदा, कोचई, डांग, कांदा, केवकांदा यांचा समावेश आहे. रानभाज्यांमध्ये तरोटा, हरतफेरी, कुण्याचे फुल (सुकवा), माठ, पातुर, रान फळ, दुर्मिळ वनस्पती आहेत.खाद्य संस्कृतीचे घडले दर्शनजि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी येथील विद्यार्थ्यांनी २० प्रकारच्या वालाच्या शेंगा प्रदर्शनीत ठेवल्या. त्यात एक दुर्मिळ खड्या वाल होते. मोह फुलापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ, कोचई, अंबाडीचे पदार्थ, रानभाज्या, लाखोळीचे पदार्थ व विविध खाद्य संस्कृतीचे दर्शन घडले.
प्रदर्शनातून पोषण तत्त्वांची जागृती
By admin | Updated: February 26, 2015 01:02 IST