शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

७७ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

दिल्ली निजामुद्दीन येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात हाय अर्लट देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर सुरू केली आहे.

ठळक मुद्देअहवाल प्राप्त होण्यास विलंब । ३३ प्रवासी व १६६ व्यक्तींचे अलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्यांचा शोध घेवून त्यांना शहरातील कुडवा परिसरातील आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. शुक्रवारपर्यंत एकूण ५९ जणांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामुळे एकूण ७७ जणांच्या अहवालाची जिल्हा आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त होण्यास विलंब असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत सुध्दा वाढ झाली आहे.दिल्ली निजामुद्दीन येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात हाय अर्लट देण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर सुरू केली आहे.५६ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना कुडवा येथील आयुर्वेदीक महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. तर शहरातील गणेश नगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे नमुने सुध्दा तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आहे.हे सर्व मिळून एकूण ७७ जणांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. तर दिल्ली निजामुद्दीन प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे नागपूर येथील मेयो येथील प्रयोगशाळेतील मशिनमध्ये शुक्रवारी काही तरी बिघाड आला होता. त्यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.१६६ व्यक्ती होम क्वारंटाईनजिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत २५१ प्रवाशी विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आले. त्यांच्या संपर्कात ९४५ व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्या सर्वांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण आले होते. २१८ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या १६६ व्यक्तींचा १४ दिवसाचा वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणाचा कालावधी संपलेला आहे. ४ एप्रिलपर्यंत विदेशातून प्रवास करून आलेल्या ३३ प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेल्या १६६ व्यक्ती वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणामध्ये आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाची देखरेख आहे. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत ९५ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १७ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ७७ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या