शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावर अवतरले भारतरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:15 IST

सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षाभिंत प्रेरणादायी ठरावी असा अनेकांचा मानस असतो. परंतु गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरित्या लोकांच्या ध्यानीमनी राहावे. यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचे काम केले आहे.

ठळक मुद्देवाटसरूंना मिळेल प्रेरणा : ४५ भारतरत्नांचे काढले चित्र

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षा भिंतीवर निसर्गाचा देखावा काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षाभिंत प्रेरणादायी ठरावी असा अनेकांचा मानस असतो. परंतु गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी भारतात आजपर्यंत किती भारतरत्न झालेत हे सहजरित्या लोकांच्या ध्यानीमनी राहावे. यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना प्रेरणा मिळवून देण्याचे काम केले आहे.पावसामुळे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील भिंत खाली कोसळली होती. त्यानंतर सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्या ७० फूट लांब व ६ फूट उंच सुरक्षा भिंतीचा वापर समाजात जनजागृती करण्यासाठी केला. गोंदिया जिल्ह्यात सारस वैभवही त्या भिंतीवर यायला हवे ही मनोमन इच्छा असतांना त्यांनी देशातील सर्व ४५ भारतरत्नांचे चित्र त्या ७० फूट लांब असलेल्या सुरक्षाभिंतीवर काढून लोकांना एक प्रेरणा देणारी भिंत तयार केली. गोंदियातील दोन आर्टिस्टच्या माध्यमातून या सुरक्षा भिंतीवर भारतरत्नांचे चित्र काढण्यात आले. गोंदियाच्या पतंगा मैदानावर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील भागात जिल्हाधिकारी,मुख्य कार्यपालन अधिकारी, मुख्य न्यायाधीश, पोलीस अधीक्षक व जि.प.अध्यक्ष यांचे शासकीय निवासस्थान याच रस्त्यावर आहेत. त्या बंगल्यांच्यासमोर कर्मचाºयांची वसाहत आहे. त्या वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या मुलांची याच रस्त्यावरून ये-जा असते. त्या मुलांना, कर्मचाऱ्यांना या भारतरत्नांची सहज माहिती व्हावी, यासाठी ही सुरक्षाभिंत त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे. सहजरित्या कुणालाही प्रश्न विचारला की देशात आतापर्यंत किती भारतरत्न झालेत तर पदावर असलेल्या मोठ्या-मोठ्या अधिकाऱ्यांनाही या प्रश्नाचे उत्तर सहज आठवत नाहीत. परंतु या निमित्ताने गोंदियाच्या पोलीस अधिक्षकांनी या सुरक्षाभिंतीवर तयार केलेल्या चित्रांमुळे आता गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना ती भिंत पाहिल्यावर सहजरित्या भारतरत्न कोण-कोण झाले याचे स्मरण होणार आहे. या सुरक्षाभिंतीतून जनजागृतीपर व सामान्य ज्ञान वाढविणारी ही भिंत आजघडीला जिल्ह्यात कुतूहलाचा विषय ठरत आहे.‘त्या’ भिंतीवर हे भारतरत्नपोलीस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्यद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा भिंतीवर भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी.व्ही.रमण, भगवान दास, एम. विश्वसर्या, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभपंत, धोंडो केशव कर्वे, बिधानचंद्र रॉय, पुरूषोत्तम दास टंडन, राजेंद्र प्रसाद, डॉ. जाकीर हुसेन, पांडुरंग वामन काने, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, वराहगीरी व्यंकटगिरी, के. कमराज, मदर टेरेसा, विनोबा भावे, खान अब्दुल गफ्फार खान, एम.जी. रामचंद्रन, डॉ. बी.आर. आंबेडकर, नेल्सन मंडेला, वल्लभभाई पटेल, राजीव गांधी, मोरारजी देसाई, अब्दुल कलाम आझाद, जे.आर.डी.टाटा, सत्यजीत रे, ए.पी.जे.अब्दुल कलाम, गुलजारीलाल नंदा, अरूणा असफ अली, एम.एस.शुब्बलक्ष्मी,चिदंबरम सुब्रमण्यम, जयप्रकाश नारायण, रवी शंकर, अमर्त्य सेन, गोपीनाथ बरडोई, बिस्मील्ला खान, भीमसेन जोशी, सी.एन.आर.राव, सचिन तेंडुलकर, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालविय यांचे चित्र काढण्यात आले. ती भिंत आकर्षक दिसावी यासाठी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेला सारस त्या भिंतीवर वावरतांना ठिकठिकाणी दाखविले आहे.सातवर्षे पुरस्कार घेणाऱ्यांची केली निवडपोलीस अधिक्षकांच्या बंगल्यावरील सुरक्षा भिंतीवर ४५ भारतरत्न चित्रातून हुबेहुब उतरविण्याचे काम गोंदियातील आर्टीस्ट इरफान कुरेशी यांनी केले आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. गोंदियातील एका खासगी शाळेत ते चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वनविभागामार्फत दरवर्षी होणाºया विदर्भ चित्रकला स्पर्धेत मागील सात वर्षापासून ते पारीतोषिक पटकावित असल्यामुळे पोलीस अधिक्षकांनी त्यांची निवड करून ते चित्र काढण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते.नवीन तयार करण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचा वापर एक चांगला संदेश समाजाला देण्यासाठी देशातील संपूर्ण भारतरत्नांची माहिती व चित्र त्या सुरक्षा भिंतीवर तयार करण्यात आली. देशातील रत्नांची सहज माहिती या माध्यमातून लोकांना होऊ शकेल.- हरिष बैजलपोलीस अधीक्षक गोंदिया.