शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सारसांच्या संवर्धनासाठी रसायनांचा वापर टाळा

By admin | Updated: January 26, 2016 02:39 IST

सारसांचे अस्तित्व असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर न जैविक कीटकनाशकांचा वापर करु

गोंदिया : सारसांचे अस्तित्व असलेल्या शेतात शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर न जैविक कीटकनाशकांचा वापर करु न या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही याची काळजी संबंधित शेतकरी बांधवांनी घ्यावी. अशा शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी सूचना पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली.सारस महोत्सवाचे औचित्य साधून ना.बडोले यांनी आपल्या सौभाग्यवती शारदाताई बडोले यांच्यासह रविवारी पहाटे सारस पक्ष्यांचे अस्तित्व असलेल्या गोंदिया तालुक्यातील झिलमिली आणि परसवाडा तलाव परिसराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना सारस पक्षी बघायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बनसोडे व सारस संवर्धनासाठी पुढाकार घेत असलेले लोक प्रामुख्याने उपस्थित होते. सारसांसह अन्य स्थलांतरीत पक्षी मोठ्या प्रमाणात या तलाव परिसरात दिसत असल्यामुळे त्यांच्या उपजिविकेसाठी लागणारे शेवाळ, पाणगवत, देवधान, कीटक धोक्यात येणार नाही याची काळजीसुद्धा परसवाडा येथील जैविक विविधता समितीने घ्यावी असे समितीच्या सदस्यांना ना.बडोले यांनी सांगितले. परसवाडा येथे जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या पक्षीविषयक माहिती केंद्राची पाहणी त्यांनी यावेळी केली. या केंद्रात सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांची छायाचित्रे तसेच जैवविविधतेबाबतची माहिती पर्यटकांना व पक्षी अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी परसवाडा जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सलीम शेख-अध्यक्ष, डुलेंद्र हरिणखेडे-सरपंच, गोविंद उईके-उपसरपंच, लखन हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, राहूल भावे, रितराम क्षीरसागर, गौरव बोपचे, मुन्नालाल पारधी व अनुराग शुक्ला उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सारस महोत्सवाचा समारोप ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला४सारस पक्ष त्याच्या देखणेपक्षासाठी जसा ओळखला जातो तसेच त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी जोडीदाराशी एकनिष्ठ राहून करणाऱ्या प्रेम करणारा पक्षी अशी त्याची ओळख आहे. एकदा दोन सारसांची (नर-मादी) जोडी जमली तर आयुष्यभर ते सोबतच जगतात आणि सोबतच मरतातही. म्हणजे एक जोडीदार दगावल्यास दुसराही प्राण सोडतो. त्यांच्या या अनोख्या प्रेमामुळेच जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘सारस महोत्सवा’चा समारोप ३१ जानेवारीऐवजी व्हॅलेंटाईन्स डे अर्थात प्रेम दिनाला केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.- संवर्धनातील अडचणींवर चर्चा४ सारस पक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यांचा धोक्यात असलेला अधिवास, त्यांच्या घरट्यांची जपणूक या विषयावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मानद वन्यजीव रक्षक व जैविक विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.४ सारस पक्षांना बघण्यासाठी आता पर्यटकांची व पक्षी अभ्यासकांची पावले मोठ्या प्रमाणात झिलमिली व परसवाड्याकडे वळत आहे. हे पक्षी बघताना आपल्यापासून त्यांना धोका जाणवेल अशा प्रकारचे कृत्य कोणीही करु नये. सारस दिसल्यानंतर त्याला जवळून पाहण्याचा, टाळी, शिट्टी वाजविण्याचा मोह टाळावा. ४ परसवाडा तलावाजवळ उभारलेल्या पक्षी निरीक्षण मनोऱ्यावरून सारस व अन्य पक्षी बघावे तसेच तलावाजवळ पॉलीथीन पिशव्या कुणीही टाकू नये अशी सूचनाही यावेळी करण्यात ाली. ४ सारस संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करु न त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. गावकऱ्यांमध्ये जागरुकता४सारस महोत्सवामुळे सारस व अन्य स्थलांतरीत पक्षांचे संरक्षण आणि संवर्धनाची लोकचळवळ उभी झाल्याचे चित्र पालकमंत्र्यांना परसवाडा गावात प्रवेश करताना दिसून आले. अनेक घरांच्या भिंतीवर सारसांचे तसेच ग्रे लेग गूज, बार हेडेड गूज, नॉर्थन पिंटेल, फिजंट टेल जकाना, परपल स्पॅम्पेन, कॉम्ब डक, लेसर व्हिसलींग डक आदी स्थलांतरीत पक्षांचे चित्र पहावयास मिळाले.