शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापनातून हानी टाळा!

By admin | Updated: September 28, 2016 01:16 IST

कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जीवित व वित्तहानी

विजय सूर्यवंशी : एनडीआरएफ प्रदर्शनी व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळागोंदिया : कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता, या आपत्तीतून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी लोकसहभागातून आपत्तीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.सोमवारी २६ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरण पुणे येथील पाचव्या बटालीयनचे मेजर दुलीचंद, मेजर ददन तिवारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाच्या बटालीयनने पाच दिवसांच्या वास्तव्याच्या काळात जिल्ह्यातील जास्तीत जास्त जणांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण द्यावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान डॉक्टरपासून तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असले पाहिजे. पूर परिस्थितीच्या काळात योग्य समन्वय रहावे यासाठी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवनी तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचीही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील ८५ गावे पुराने बाधित होतात. या गावातील नागरिकांनी पूरपरिस्थितीच्या काळात पूर परिस्थतीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात. मानवनिर्मित दुर्घटना टाळण्यासाठी नेहमी सतर्क रहावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.प्रास्ताविकातून महिरे यांनी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची चमू पाच दिवस जिल्ह्यातील विविध तालुक्यात आग प्रतिबंधक, पूर परिस्थिती नियंत्रण याबाबतची रंगीत तालीम देणार आहे. यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी स्थानिक स्तरावर तयारी करावी, असे सांगितले. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेवून आपत्तीच्या काळात या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दुलीचंद यांनी आपत्तीबाबत प्रत्येकाने जागृत असणे गरजेचे असल्याचे सांगून कोणत्याही प्रसंगी सजग राहण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली.या वेळी एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार, बचाव कार्य, आपत्तीच्या वेळी घेण्यात येणारी दक्षता, घरात उपलब्ध असलेल्या संसाधनाचा आपत्तीच्या काळात कसा उपयोग करावा, याबाबत माहिती देण्यात आली. एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनचे सैनिक एम. विजयन, डी.एम. मतिकीरी, राजेंद्र जाट, माहीर जालंदर, राजीवकुमार, राकेशकुमार पाठक, एस.एस. पांडे, के.एस. जौनध्याल, आर. सिल्व्हाकुमार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकांसह माहिती दिली.कार्यशाळेला प्रभारी उपविभागीय अधिकारी के.डी. मेश्राम, तहसीलदार अरविंद हिंगे, प्रा.डॉ. कविता राजाभोज, सहायक अधीक्षक किरीमकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रविणकुमार, व्ही.सी. कोल्हटकर, संजय सांगोडे, विविध महाविद्यालयाचे समन्वयक, मनोहर म्युन्सीपल विद्यालय, एस.एस. गर्ल्स कॉलेज, महावीर मारवाडी विद्यालय, जे.एम. हायस्कूल, एन.एम.डी. कॉलेज येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, व्हाईट आर्मीचे युवक, गृहरक्षक दल, पोलीस दलचे जवान यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.(प्रतिनिधी)बचाव कार्याच्या साहित्यांचे प्रदर्शनबचाव व मदत कार्यात उपयोगात येणारे साहित्य व साधने, स्वयंचलीत डोंगे, कटर, कामात येणारे अवजारे, बोल्ड कटर, कम अलाँग, सरप्राईडर कटर, रेस्प्रो कटींग सॉ, एअर लिफ्टींग बॅक, चिपींग हॅमर, ड्रील मशीन तसेच पूर परिस्थितीच्या काळात उपयोगात येणारे साहित्य, आऊट बोर्ड मोटर, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, लाईफ लाईन, प्रथमोपचार पेटीतील साहित्य याबाबत प्रदर्शन एन.डी.आर.एफ. पुणे बटालीयनच्या वतीने लावण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना बटालीयनच्या सैनिकांनी माहिती दिली.