शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

‘संतुलित जीवनपद्वती’ने हृदयरोग टाळा

By admin | Updated: September 24, 2015 02:09 IST

मानवी शरीरात मेंदू व हृदय ही दोन सर्वात महत्त्वाचे अंगं आहेत. मेंदूची संवेदना व हृदयाची धडधड बंद पडल्यावरच माणसाचा मृत्यू होते. हृदयात सर्व रक्तवाहिन्या मिळतात.

आज हृदयरोग जागरुकता दिन : व्यसनांमुळे युवावर्गातही वाढतेय प्रमाण, जिल्ह्यात तज्ज्ञांचा अभावदेवानंद शहारे  गोंदियामानवी शरीरात मेंदू व हृदय ही दोन सर्वात महत्त्वाचे अंगं आहेत. मेंदूची संवेदना व हृदयाची धडधड बंद पडल्यावरच माणसाचा मृत्यू होते. हृदयात सर्व रक्तवाहिन्या मिळतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सांभाळणे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक असते. मात्र आज झालेली असंतुलित जीवनपद्धती हृदयरोगास कारणीभूत ठरत असून युवावर्गही हृदयरोगाला बळी पडत आहे. त्यामुळे संतुलित जीवनपद्धती हाच यावरील ‘रामबाण’ उपाय आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. हृदयरोग जागरूकता दिनाच्या पार्श्वभूमीवर केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रगती भोळे यांनी यावर सविस्तर माहिती सांगितली. आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टेरॉलचे थरसाठी वाढतात. त्यात कोरोनरी आर्टरीचा (रक्तवाहिनी) देखील समावेश असतो. त्याचा परिणाम रक्त पुरवठ्यावर होतो. त्यामुळे हृदयघात होण्याची शक्यता असते. हृदयरोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वीच्या काळात ४० वर्षे वयानंतर माणसाला हृदयरोग झाल्याचे आढळत होते. परंतु आधुनिक काळात जीवनशैली व आहार-विहारात झालेला बदल, तसेच शारीरिक श्रमाच्या कमतरतेमुळे व वाढलेल्या व्यवसानिधतेमुळे ३० ते ३५ वयोगटातील युवावर्गातही हृदयरोगाचे प्रमाण आढळून येत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रूग्णांना हृदयरोगाचा अधिक धोका असतो.आधुनिक वैद्यकीय पद्धतीत अँजिओग्रॉफी व अँजिओप्लॉस्टीद्वारे हृदयरोगाचे निदान व उपचार केले जाते. हृदयातील धमन्या किंवा वाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉक असेल तर याचे निदान अँजिओग्रॉफीद्वारे होते. त्यात असलेली समस्या दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. मात्र हे ठरविण्याचे अधिकार केवळ तज्ज्ञांना असतात. याशिवाय इतर बाबी न करता सरळ प्रायमरी अँजिओप्लॉस्टीसुद्धा केली जाते, असे डॉ. भोळे यांनी सांगितले.हृदयरोगाची कारणेधूम्रपान करणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, कमी एचडीएल व वाढीव कोलेस्टेरॉल, शारीरिक श्रमाची कमतरता, आनुवंशिकता, तणाव, रागीटपणा व चिंता, तसेच वंशानुगत मुद्द्यांचा समावेश हृदयरोगाच्या कारणांमध्ये आहे. याशिवय तंबाखूचे सेवन, धुम्रपाण करणे, अधिक प्रमाणात तळलेले व स्रिग्ध पदार्थ खाणे, सिडेंटरी (बैठ्या जागेवरील काम), लठ्ठपणा आदी बाबी हृदयरोगासाठी कारणीभूत असतात.हृदयरोगाची लक्षणे१. छाती दुखणे. २. दम लागणे. ३. चालताना लवकरच दम भरणे. ४. पायांवर सुज येणे (पुढील पायरी). ५. घाबरल्यासारखे वाटणे. ६. अटॅकप्रसंगी घाम सुटणे. ७. भोवळ येणे.ध्यान-योगा ठरतो फायदेशिरसुरुवातीपासूनच ध्यान-धारणा व योगा-प्राणायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग होत नाही. ध्यान मनावर नियंत्रण ठेवते तर योगा शरीरावर नियंत्रण ठेवते. यात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेवून ध्यान-योगाचा आपल्या जीवनात समावेश केल्यास हृदयरोग होणे टाळले जावू शकते. रूग्णाने ध्यान-योगा पद्धतीचा अंतर्भाव आपल्या जीवनपद्धतीत केला तर हृदयरोगावर नियंत्रण मिळविले जावू शकते, असे डॉ. भोळे म्हणाल्या.