शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:50 IST

कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प उभारण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षी योजना : पालकमंत्री राजकुमार बडोले हस्ते भूमिपूजन

आॅनलाईन लोकमतराजोली : कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्यामुळे बालमृत्यूला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे उमेदच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कुपोषण, महिला सबलीकरण व उद्योजगता या मुख्य उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून भरनोली येथे स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयम प्रकल्पाचे (मदर युनिट) भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) पार पडले.याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, माजी सभापती प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, तानाजी ताराम, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, तालुका व्यवस्थापक रेशिम नेवारे, प्रभाग समन्वयक भावे, ग्रामसंघाचे अध्यक्ष जमदाळ, सरपंच प्रमिला कोरामी उपस्थित होते.महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी गटाच्या माध्यमातून एकत्र यावे. बचय गटातील महिलांच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक (उमेद) प्रविण भांडारकर यांनी मांडले.काय आहे स्वयम प्रकल्पस्वयम प्रकल्पांतर्गत भरनोली येथे उमेद अभियानाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले ग्रामसंघाच्या वतीने २० बाय ५० फूट आकाराचे कुक्कुट पक्षी शेड तयार करण्यात येणार आहे. ग्रामसंघ शेडमध्ये अंडी देणाºया गुणवत्ताधारक प्रजातीच्या कुक्कुट पिल्ल्यांचे संगोपन केले जाईल. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने निवडलेल्या ४१७ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यामध्ये प्रति लाभार्थी ४५ पक्षी वाटप केले जातील. ३ महिन्यानंतर लाभार्थी महिला कुक्कुट पक्ष्यांच्या अंड्याचा पुरवठा एकात्मिक बालविकास कार्यालयांतर्गत सुरू अंगणवाड्यांमधील मुले, लाभार्थी स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांना केला जाईल. त्या मोबदल्यात पक्षीपालक लाभार्थी महिलेस ८-१० रूपये प्रति अंडी याप्रमाणे रक्कम मिळेल. त्यामुळे कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसण्यास मदत होईल. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा सुधारेल, असे उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक प्रविण भांडारकर यांनी सांगितले.