शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्यांची सरासरी गती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. या आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीमुळे दपूम रेल्वेच्या गाड्यांच्या सरासरी गतीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले ...

ठळक मुद्देआॅटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली : प्रत्येक कि.मी. अंतरावर लागलेल्या सिग्नलवरून मिळणार गाड्यांची योग्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लाक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. या आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीमुळे दपूम रेल्वेच्या गाड्यांच्या सरासरी गतीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या गाड्यांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रवाशांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यामागे हा हेतू आहे. या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभाग गाड्यांच्या परिचालनात सर्वाधिक महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. गाड्यांना दर किलोमीटर सुरक्षितरित्या समोर वाढविताना गाड्यांचा क्रम सतत विनाअडथळ्याने अबाधित रहावा व आपल्या गंतव्यापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी सदर विभाग कार्य करीत आहे. गाड्यांना आणखी अधिक गती प्रदान करण्याच्या दृष्टीने सिग्नल व टेलीकम्युनिकेशन विभागाद्वारे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली क्रमबद्ध पद्धतीने लागू करून बहुआयामी लाभ प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.रेल्वेमध्ये आतापर्यंत एका स्थानकापासून दुसºया स्थानकाचे अंतर पार केल्यानंतरच सिग्नल हिरवे होते. तेव्हाच दुसऱ्या गाडीला त्या मार्गावर समोर जाण्यासाठी सोडले जाते. परंतु आता काही रेल्वे मार्गांमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्या मार्गांवर प्रत्येक किलोमीटरमध्ये सिग्नल लावण्यात आले आहेत. त्यामुळे एका स्थानकातून सुटून दुसऱ्या स्थानकावर पोहोचण्यापर्यंत जवळपास प्रत्येक किलोमीटरवर लागलेल्या सिग्नलवरून गेल्यावर गाडीच्या योग्य स्थितीची माहिती मिळते.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये सध्या कलमना ते काचेवानीपर्यंत १०१ किमीचा १३ ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग व गोंदिया ते गुदमापर्यंत १२ किमीचा एक ब्लॉक स्टेशनचा रेल्वे मार्ग पूर्णत: आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्यात आला आहे. याशिवाय बिलासपूर ते जयरामनगरपर्यंत १४ किलोमीटर, बिलासपूर ते बिल्हा स्टेशनपर्यंत १६ किमी व बिलासपूर ते घुटकू स्थानकापर्यंत १६ किमीच्या रेल्वे मार्गांना आॅटोमेटिक सिग्नल प्रणालीयुक्त करण्याची स्वीकृती प्राप्त झाली आहे.गाड्यांना ट्रेस करणे होणार सुगमदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने अनेक लाभ रेल्वे प्रवासी व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या ग्राहकांना होणार आहे. संपूर्णपणे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली लागू झाल्यास रेल्वे मार्गांच्या क्षमतेत मोठी वृद्धी होईल. त्यामुळे प्रत्येक गाडीच्या सरासरी गतीत मोठी वाढ होईल. गाड्यांना किमी दर किमी ट्रेस करणे सुगम होईल. त्यामुळे कोणत्याही एका मार्गावर गाड्यांच्या जमावाची स्थिती बनणार नाही. या प्रणालीतून संरक्षणाच्या दृष्टीने गाड्यांच्या परिचालनात चांगली सुधारणा होईल. त्यामुळे आॅटोमेटिक सिग्नल प्रणाली सर्व दृष्टीने सुविधाजनक व लाभदायक सिद्ध ठरण्याची शक्यता आहे.