शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी अभावी रखडले वाळू घाटाचे लिलाव; वाळूला प्रती ब्रास मिळतोय ८ हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे. 

ठळक मुद्देघरकुल लाभार्थ्यांना सर्वाधिक फटका : वाळूच्या तस्करीत वाढ, महसूल पाण्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि  राज्यस्तरीय पर्यावरण समितीची वाळू घाटांच्या लिलावासाठी अद्यापही मंजुरी अद्यापही मिळाली नसल्याने जिल्ह्यातील २४ रेती घाटांचे लिलाव झालेले नाही. याचा वाळू तस्कर लाभ घेत असून २ हजार रुपये प्रती ब्रास मिळणाऱ्या वाळूसाठी आता बांधकाम करणाऱ्यांना  ८ ते १० हजार रुपये मोजावे लागत आहे. वाळू तस्कारांकडून घाट पोखरले जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल सुध्दा बुडत आहे. जिल्ह्यात मागील ९ महिन्यांपासून वाळू घाटांचे लिलाव न झाल्याचा सर्वाधिक फटका घरकुल लाभार्थ्यांना बसत आहे. त्यांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी गरजेपाेटी ८ ये १० हजार रुपये मोजून वाळू खरेदी करावी लागत आहे. पर्यावरण समितीच्या मंजुरी अभावी कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. 

जिल्ह्यात कुठून येते वाळूजिल्ह्यात सर्वात मोठे रेती घाट गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात आहे. त्यामुळे याच घाटावरुन सर्वाधिक वाळू येते. मात्र यंदा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील अत्री, किन्ही या घाटावरुन वाळू येत आहे. 

हरित लवादाची बैठकवाळू घाटाचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जनसुनावणी व  पर्यावरण समितीची मंजुरी आवश्यक असते. पर्यावरण विषयक नियमाचे उल्लंघन होवू नये यासाठी हरित लवादाची बैठक होते. मात्र ही बैठक झालेली नाही.  

राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने जिल्ह्यातील २४ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली आहे. या समितीची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.  - सचिव वाढीवे ,जिल्हा खनिकर्म अधिकारी गोंदिया

टॅग्स :sandवाळू