शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

मंजुरीअभावी रखडले रेतीघाटांचे लिलाव

By admin | Updated: December 10, 2014 22:59 IST

पावसाळ्यात विविध नद्यांवरील घाटांवर जमा झालेल्या रेतीचा उपसा करण्यासाठी होणारे लिलाव यावर्षीही रखडले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे डिसेंबर महिना अर्धा लोटत असताना रेतीघाटांचे

२.८४ कोटींचा महसूल अपेक्षित : चोरट्या मार्गाने उपसा, शासनाचा बुडतोय महसूलनरेश रहिले - गोंदियापावसाळ्यात विविध नद्यांवरील घाटांवर जमा झालेल्या रेतीचा उपसा करण्यासाठी होणारे लिलाव यावर्षीही रखडले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे डिसेंबर महिना अर्धा लोटत असताना रेतीघाटांचे प्रस्तावच मंजुरीसाठी आयुक्त कार्यालयात अद्याप गेलेले नाही. त्यामुळे अनेक शासकीय व खासगी कामांसाठी लागणाऱ्या रेतीची माफियांकडून चढ्या दराने विक्री होत आहे.१ आॅगस्टपासून नवीन घाटांच्या लिलावाची प्रक्रिया करण्याचे काम सुरू होते. दोन वेळा रेतीघाटांचे सर्वेक्षण करणे, त्यानंतर दर ठरविणे, पर्यावरण विभागाकडून मंजुरी घेणे घाट लिलावाचे प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविणे ही सर्व प्रक्रिया आॅक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कारण आॅक्टोबरनंतर बांधकामाची कामे जोमाने सुरू होतात. परंतु डिसेंबर महिना अर्धा संपत आला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाने अद्याप अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे प्रस्तावच पाठविले नसल्याचे सांगितले जात आहे.१८ नोव्हेंबर रोजी ४५ रेतीघाटांचे प्रस्ताव खनिकर्म विभागाने शासनाला पाठविले होते. परंतु मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत रेतीचा उपसा करताना कंत्राटदार जेसीबीने रेती काढून जास्त प्रमाणात रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे अश्या प्रकारचे आठ घाट कमी करून ३७ घाटांचे प्रस्ताव पाठविण्याचे सूचविण्यात आले. या घाटांचे लिलाव झाल्यास शासनाला २ कोटी ८४ लाख १५ हजार ५३ रूपये महसूल मिळणार असल्याचे सांगितले आहे. सन २०१३ मध्ये खनिकर्म विभागामार्फत ४४ रेतीघाटांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यापैकी २७ घाटांना मंजुरी देऊन त्यांचे लिलाव करण्यात आले होते. त्यापासून जिल्हा प्रशासनाला २ कोटी २० लाख ५९ हजार १३६ रूपयांचा महसूल मिळाला होता.