शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बैठकी बाजार वसुलीसाठी होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:38 IST

नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेचा प्रयोग : पर्यायी व्यवस्थेसाठी धडपड, नगर परिषदेचे उत्पन्न वाढणार

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगराध्यक्षांनी बैठकी बाजार बसुली बंद करण्याची घोषणा केल्याने बाजार विभागाचे उत्पन्न बंद पडले होते. मात्र असे करताना तेवढ्याच उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे नगर परिषद अधिनियमांत नमूद आहे. त्यामुळे उत्पन्नाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगर परिषद बाजार विभागाने निविदा काढली असून यात आॅनलाईन बोली लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर नवे अध्यक्ष व नव्या सदस्यांच्या नव्या पाळीला सुरूवात झाली. यांतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांच्या पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ कलम २७२ अंतर्गत बैठकी बाजार वसुली केली जात होती. मात्र बाजार वसुली बंद करताना तेवढ्याच रकमेच्या पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था करणे गरजेचे असून तशी अधिनियमांत नोंद आहे. यामुळे बाजार विभागाने नगराध्यक्षांच्या घोषणेनंतरही १४ फेब्रुवारी पर्यंत बाजार वसुली सुरू ठेवली. मात्र नगराध्यक्षांनी घोषणा केल्याने बाजारात दुकान लावणाऱ्यांकडून वसुली कर्मचाºयांना प्रतिसाद देण्यात आला नाही.बैठकी बाजार वसुलीतून बाजार विभागाला वार्षीक सुमारे सात लाख रूपयांचे उत्पन्न येत होते. मात्र अचानकच हे उत्पन्न बंद झाल्याने नगर परिषदेची आर्थिक अडचण वाढली होती. शिवाय अधिनियमात नोंद असल्यामुळे तेवढ्याच रकमेची पर्यायी व्यवस्था करणे नगर परिषदेला गरजेचे होते. मात्र बैठकी बाजार वसुली करू नये असा ठराव १६ मार्च २०१७ रोजीच्या विशेष सर्व साधारण सभेतही घेण्यात आला होता. यावर बाजार विभागाने पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्टेडियम चौपाटी येथील २१ व खोजा मस्जीद फुटपाथ वरील १३ दुकानांकडून दरमहा एक हजार रूपये वसुली सुरू केली. मात्र यातही दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर बाजार वसुलीच्या या प्ररकरणाला घेऊन व नगर परिषदेची आर्थिक अडचण सोडविता यावी यासाठी नगराध्यक्ष इंगळे यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाºयांकडे ठराव रद्द करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आता १५ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेत बैठकी बाजार वसुलीसाठी कंत्राट देण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी नगर परिषदेच्या बाजार विभागाने १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छूकांकडून निविदा मागविली असल्याची माहिती आहे.आॅनलाईन बोली लागणारनगर परिषदेच्या बाजार विभागाने बैठकी बाजार वसुली लिलावासाठी १० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात किमान बोली ११ लाख रूपयांची ठेवण्यात आली आहे. यासाठी २६ मार्च रोजी आॅनलाईन बोली लावली जाणार असून त्यात ५ हजार रूपयांच्या पटीने बोली वाढविता येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नगर परिषदेचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे येणाºया काळातच दिसेल.