शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:35 IST

ग्रामीण संस्कृतीत वसलेला कबड्डीचा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. कबड्डीच्या देशी खेळातून युवकांची खेळाप्रती आवड वाढते. तसेच स्वस्थ शरीर व मनाची निर्मिती होत असून युवकांत सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रतिभावान खेळाडंूना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम कामठा येथील स्पर्धेत ढाकणीचा संघ विजेता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण संस्कृतीत वसलेला कबड्डीचा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. कबड्डीच्या देशी खेळातून युवकांची खेळाप्रती आवड वाढते. तसेच स्वस्थ शरीर व मनाची निर्मिती होत असून युवकांत सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रतिभावान खेळाडंूना राज्य व राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेंतर्गत तालुक्यातील ग्राम कामठा येथील अंतीम सामन्यातील विजेत्या ग्राम ढाकणी येथील संघाला पुरस्कृत करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले यांनी, कामठा येथे क्रीडा संकुल बांधकाम तसेच शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज, मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांचे प्रतिक आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपकडून युवांना धोका देण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा सचिव गेंदलाल शरणागत, प्रकाश रहमतकर, लता दोनोडे, चमन बिसेन, सावलराम महारवाडे, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, मनोज दहीकर, धनलाल ठाकरे, विजय लोणारे, अर्जुन नागपुरे, दिनेश अग्रवाल, अजय गौर, एस.ए.वहाब, अनिल सहारे, पी.जी.कटरे, विठोबा लिल्हारे, उषा शहारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे गावकरी उपस्थित होते.आता दरवर्षी राज्यस्तरीय प्रौढ कबड्डी स्पर्धाआमदार चषक कबड्डी स्पर्धेत १५० हून अधीक संघातील १५०० हून अधीक खेळाडूंनी सहभाग घेतला. या उत्स्फुर्त प्रतिसादाला बघता आमदार अग्रवाल यांनी कबड्डीला प्रोत्साहन मिळावे यासाठी आता दरवर्षी राज्यस्तरीय प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर कामठा येथे अक्षयतृतीयेला सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचीही घोषणा केली. तसेच क्रीडा संकुल तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन दिले.