शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बबलू कटरे यांना वाचविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 01:20 IST

गेल्या १२ मार्च रोजी आमगाव-गोंदिया मार्गावर इंडिगो कार व एक्टीवा या दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात कार चालक बबलू कटरे होते.

ठाणेदार व शिपायांवर कारवाई करा : अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींची मागणी गोंदिया : गेल्या १२ मार्च रोजी आमगाव-गोंदिया मार्गावर इंडिगो कार व एक्टीवा या दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात कार चालक बबलू कटरे होते. मात्र आमगावचे ठाणेदार व सहयोगी शिपायांनी चौधरी नामक इसमास पुढे केले. प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांत तक्रार केली असता त्यांना अपमानीत करून पळविण्यात आले. त्यामुळे बबलू कटरे यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस करीत असून प्रकरणी ठाणेदार भस्मे व सहयोगी शिपायांवर कारवाई करण्याची मागणी अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. १२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता आमगाव-गोंदिया मार्गावर घडलेल्या या अपघातात इंडिगो कार क्रमांक एमएच ४०/केआर १९०१ चालक बबलू कटरे यांनी एक्टीवा क्रमांक एमएच ३५/वाय ०७६८ ला जबर धडक मारून पसार झाले. या अपघातात एक्टीवा वरील दोघांचा मृत्यू झाला. असे असतानाही ठाणेदार भस्मे यांनी कटरेंना वाचविण्यासाठी खोटी एफआयआर नोंद करून चौधरी नामक इसमास पुढे केले. जेव्हाकी प्रत्यक्षदर्शी डी.डी.टेंभूर्णेकर व यु.ए.चतुर्वेदी यांनी आमगाव पोलीस ठाण्यात जाऊन कटरेंचा नामोल्लेख केला असता त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हाकलून लावण्यात आले. करिता कटरे यांना दोघांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार मानले जावे व अटक करावी, ठाणेदार भस्मे यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्यासह शिपायांवर कारवाई करा तसेच चौधरीवरही कारवाई करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे. यासाठी त्यांनी मानवाधिकार एसोसिएटकडे निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)