शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव खुर्दच्या प्रकरणात प्रयत्न करणार

By admin | Updated: July 11, 2017 00:51 IST

आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ट करुन लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी ...

आमदार पुराम यांचे आश्वासन : गावकऱ्यांनी दिले मागण्यांचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव खुर्द ग्रामपंचायतला सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ट करुन लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी आणि लोकशाही शासन स्थापीत करण्यात यावे अशी मागणी आमगाव खुर्द (सालेकसा) येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्या मागणीचे निवेदन आमदार संजय पुराम यांना दिले आहे. तालुका भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, मागील अडीच वर्षापूर्वी सालेकसा नगर पंचायतीची घोषणा करण्यात आली. परंतु अस्सल स्वरुपात सालेकसा नगर पंचायतीमध्ये समाविष्ट होणे अनिवार्य असलेले सालेकसा नगर जे सध्या परिस्थितीत आमगाव खुर्द ग्राम पंचायतीत मोडते त्याला नगर पंचायतमध्ये शामील न केल्यास शहरवासीयांवर अन्याय झाल्यासारखे वाटते. यासाठी शहरवासीयांनी उच्च न्यायालयात सुध्दा धाव घेतली आहे. परंतु प्रकरण लंबीत आहे. न्यायालयाचा निकाल नेमका केव्हा लागेल हे सांगणे कठीण आहे. परंतु या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली तर आमगाव खुर्द आणि सालेकसा मिळून एक नगर पंचायत व्यवस्थीतरित्या अस्तित्वात येऊ शकते तसेच न्यायालयातील प्रकरण सुध्दा निरस्त होऊ शकते. ही बाब लक्षात घेता तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार पुराम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. तसेच आमदार या नात्याने आपल्या मतदारांच्या समस्या दूर कराव्या म्हणून आ. पुराम यांनाही आग्रह करण्यात आला. यावर आ. पुराम यांनी मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमगाव खुर्द येथील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निवेदन देणाऱ्यामध्ये तालुका भाजप अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या नेतृत्वात अजय वशिष्ट, दिनेश शर्मा, अजय डोये, संदीप डेकाटे, मनोज इळपाते, धीरज ब्राम्हणकर, बबलू भाटीया, आदीत्य शर्मा आदीच्या या शिष्टमंडळात समावेश होता.