शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:05 IST

सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : नवेगावबांध येथे रोजगार व मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि.१७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान (नागपूर) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने आयोजित रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बाटीर्चे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी आलोक मिश्रा, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, सडक-अर्जुनी पंचायत समिती सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, कविता रंगारी, पदमा परतेकी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, लायकराम भेंडारकर, देवेंद्र टेंभरे, विजय बिसेन, मधुकर मरस्कोल्हे, लक्ष्मीकांत धानगाये, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, प्राचार्य बलवीर, गजानन डोंगरवार, रतन वासनिक मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजे. या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे बार्टीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले. कणसे यांनी, या मेळाव्याच्या माध्यमातून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे असे सांगितले.याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्राम उसगाव येथील रुपाली मेश्राम हिने वाघाशी मुकाबला करुन प्राण वाचविण्याचे शौर्य दाखविल्याबद्दल त्या विद्यार्थिनीला पालकमंत्र्यांच्या हस्ते बार्टीमध्ये समता दूत पदावर नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी मांडले. संचालन रत्नाकर बोरकर यांनी केले. आभार बार्टीच्या प्रकल्प संचालक रुपाली आवळे यांनी मानले.विविध विभागांचे स्टॉल्सया मेळाव्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, बँकींग, फायनान्स, मॅन्यूफॅक्चरींग, इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, हॉस्पीटॅलिटी, एव्हीएशन व जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्यचा स्टॉल लावण्यात आला होता. लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.