शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

संकटातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 21:16 IST

यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही.

ठळक मुद्देपालकमंत्री : चक्र ीवादळ बाधितांना धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धान रोवणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान रोवणी केली त्यांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे पीक पाहिजे त्या प्रमाणात आले नाही. अलिकडेच धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे दुष्काळाची स्थिती व दुसरीकडे तुडतुड्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.गोरेगाव तालुक्यातील तेढा येथे १७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय गोरेगावच्या वतीने चक्र ीवादळामुळे बाधित आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती दिलीप चौधरी, जि.प. सदस्य ज्योती वालदे, जि.प. माजी समाज कल्याण समिती सभापती कुसन घासले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, माजी जि.प. सदस्य जितेंद्र शेंडे, तेढा सरपंच रत्नकला भेंडारकर, उपसरपंच डॉ. विवेक शेंडे यांची उपस्थिती होती.ना. बडोले पुढे म्हणाले, पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी देता येणार नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड करावी. यासाठी ३ हजार क्विंटल हरभरा अनुदानावर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. उपग्रहाच्या आधारे यावर्षी दुष्काळाचे मोजमाप करण्यात आल्यामुळे तीनच तालुके मध्यम दुष्काळाचे घोषित करण्यात आले आहे. सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यांसह इतर तालुकेसुध्दा दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.ज्यांनी रोवणी केली नाही त्यांना मोबदला देण्यासाठी शासन मदत करेल असे सांगून बडोले म्हणाले, गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यामुळे या तालुक्याला शासनाच्या निकषानुसार दुष्काळाच्या सवलती मिळणार आहेत. या भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून ते म्हणाले, दळणवळणासाठी चांगले रस्ते निर्माण होणार आहेत.जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र आॅनलाईन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. धान उत्पादक शेतकºयांना शासन प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य ज्योती वालदे व सरपंच रत्नकला भेंडारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तेढा व बाधित गावातील रामचंद्र भेंडारकर, छबीलाल अंबादे, सुमन टेंभूर्णेकर, डिगांबर खरोले, शांता आस्वले, पुरणलाल पटले, छबीलाल पटले, बाबुलाल मेश्राम, हिरामन पटले, भागीरथा पंचभाई, देवला घासले, पार्वता राऊत, रामचंद्र राऊत, बिजू भंडारी, झेलन कोहळे, नंदलाल गाथे, दुलीचंद राऊत, प्रेमलाल वरकडे, अशोक पटले आदी बाधितांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. तेढा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.३१ लाखांचा निधी उपलब्धगोरेगाव तालुक्यातील ११६५ घरांचे एप्रिल व मे २०१७ मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यासाठी ३१ लाख ६ हजार ५० रु पये असा निधी उपलब्ध झाला आहे. बाधितांना धनादेशाचे वाटप उर्वरित गावांत सुध्दा करण्यात येणार आहे. तेढा येथील १६१ घरांचे नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून १६८ कुटूंबांना ५ लाख १५ हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते बाधितांना करण्यात आले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले