शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी करणाऱ्या महिलेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 01:51 IST

शासकीय मान्यता प्राप्त दारू दुकाने बंद पडल्याने अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

दोन आरोपींना अटक : महिलांनी पोलीस ठाण्यात घालविले पाच तास लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : शासकीय मान्यता प्राप्त दारू दुकाने बंद पडल्याने अवैध व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. परंतु पोलिसांच्या छुप्या संरक्षणात चालणाऱ्या दारु व्यवसायामुळे महिलांची काळ रात्र ठरत आहे. मध्यरात्रीपर्यंत दारुड्यांमुळे गावातील वातावरण ढवळून निघत आहे. अवैध दारु व्यवसायामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दारु व्यवसायावर अवकळा आली. सरकार मान्य दारु दुकाने बंद पडली आहे. याचा लाभ अवैध दारू विकणारे उचलत आहेत. आमगाव तालुक्यात पुर्वीच दारु व्यवसायामुळे त्रस्त झालेले नागरिक संपूर्ण दारुबंदीकरिता लढा उभारत आहेत. परंतु अधिकृत दुकाने बंद झाल्याने अवैध दारु व्यवसायीकांनी मुसंडी मारली आहे. किंमतीपेक्षा अधिक दराने दारु विक्री करुन नफा कमावण्याकरिता आमगाव तालुक्यात प्रत्येक गावात गल्लोगल्लीत अवैध दारु विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. अवैध दारु विक्री करणारी व्यक्ती मुख्य मार्गावर आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या महिलांची सुरक्षीतता धोक्यात आली आहे. अवैध व्यवसायामुळे गावातील युवकांनाही आकर्षण ठरले आहे. रिसामा व कुंभारटोली गाव सिमेवर अवैधपणे दारु व्यवसाय करणाऱ्यांनी ठाण मांडले आहे. या व्यावसायीकांना पोलीस विभागाने कारवाई करावी, यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. परंतु पोलीस विभाग उलट अवैध दारु विक्रेत्यांना संरक्षण देत आहे. यासंदर्भात महिलांनी दारु विक्रेते व पोलीस प्रशासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त करीत १७ मेच्या रात्री १० वाजता पोलीस ठाण्यावर महिलांना मोर्चा काढून सलग पाच तास पोलिसांच्या विरूध्द आक्रोश करण्यात आला.गावात दारुबंदीची मागणी करणाऱ्या महिलांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर हल्ला चढविण्यात आला. कुंभारटोली गाव परिसरात अवैध दारु बंदी व्हावी यासाठी महिलांनी अवैध दारु विकणाऱ्या व्यक्तीला १८ मे रोजी १० वाजता चांगलाच चोप दिला. या अवैध दारु विक्रेत्याला अटक करावी यासाठी गावातील महिलांनी रात्रीच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. परंतु ठाणेदाराने दखल घेतली नाही. आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा रिसामा वार्ड क्र.६ मध्ये अवैधपणे दारुविक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लक्ष्मी ईश्वर डोंगरे यांनी आवाज उठविला. त्यामुिळे त्यांच्यावर आरोपी अविनाश मुन्ना चौधरी (२२) रा. रिसामा याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान त्याच्यावर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २१९, ५०६, सहकलम ३ (१)(आर)(एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध विक्रेत्याकडून ३२ पव्वे जप्त कुंभारटोली परिसरात अवैधपणे दारु विक्री करणारा निमचंद बारकू गोंडाणे (६०) यांच्याकडून ३२ दारूचे पव्वे किंमत १६०० जप्त करण्यात आले.