शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांवरील हल्ला हा कट?

By admin | Updated: April 15, 2016 02:18 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिव शर्मा यांच्या दोन साथीदारांना बुधवारी (दि.१३) रात्री ९.५६ वाजता अटक केली आहे.

दोघांना अटक : बुधवारी रात्री घेतले ताब्यात गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शिव शर्मा यांच्या दोन साथीदारांना बुधवारी (दि.१३) रात्री ९.५६ वाजता अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांचे नाव अनिमेश उर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे (२२,रा.गजानन कॉलनी) व गजेंद्र रामचरण साते (२१,रा.मरारटोली) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी (दि.९) शिव शर्मा व राहूल श्रीवास तिरोडा रोड वरील अशोका गार्डन रेस्टॉरेंट मध्ये दारू पीत होते. दरम्यान राहूलने अनिमेशला फोन करून बोलाविले. यावर अनिमेश हा त्याचा मित्र गजेंदला घेऊन तेथे पोहोचला. सुमारे ६.३० वाजतादरम्यान चौघे तट रचून बारमधून बाहेर आले. बाहेर आल्यावर आमदार अग्रवाल यांना टपका देंगे अशी बोलचाल करीत असताना त्यांना बाहेर टपरीवर उभ्या एका इसमाने ऐकले होते. तेथून चौघे हॉटेलात गेले व यातील गजेंद्र हा बाहेर गेटवरच थांबला. तर शिव शर्मा व राहूल श्रीवास तसेच अनिमेश हा आपापल्या बुलेटने हॉटेलाच्या आत गेले. शिव शर्मा व राहूल श्रीवास दोघे आत गेले व अनिमेश मागून हॉटेलात शिरला. तसेच आत मारहाण केल्यानंतर अनिमेशने शिव शर्मा व राहूल श्रीवास यांना बालाघाट पर्यंत सोडले. एकंदर आमदार अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा कट रचण्यात या दोघांचाही हात असल्याने पोलिसांनी दोघांना बुधवारी रात्री अटक केली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)