शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम व गोदाम केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला असून कर विभागाने सोमवारपासून कर वसुलीला सुरुवात केली आहे. यांतर्गत शुक्रवारी (दि.१८) कर वसुली पथकाने शहरातील मरारटोली परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम सील केले. तर पन्नालाल दुबे वॉर्डातील एक गोदामही सील करण्यात आले आहे. पन्नालाल दुबे वॉर्डात सील करण्यात आलेल्या गोदामावर सन २०११ पासून १ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर एटीएमवर सन २०१५-१६ पासून ८१ हजार रुपयांची थकबाकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेेने पुन्हा मालमत्ता कर वसुलीला सुरुवात केली असून यांतर्गत कर विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१८) शहरातील  एक एटीएम तसेच एक गोदामावर सीलिंगची कारवाई केली आहे. या मालमत्तांवर एकूण २ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी आहे. कर वसुली विभागाने सोमवार नंतर आता शुक्रवारी दुसरी सीलिंगची कारवाई केली आहे. गोंदिया नगर परिषदेत पूर्वी कर वसुलीच्या आड राजकारण येत होते व त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. अशात नगर परिषदेला विकास कामे करताना अडचण येत होती. तेथेच मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. मात्र मागील वर्षापासून नगर परिषदेने कर वसुलीची पद्धत बदलली असून त्याचा चांगलाच फायदा मिळत आहे. आता कुणाचीही गय न करता थकबाकीदारांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिले. त्यानुसार, विभागाकडून चांगले निकालही मागील वर्षी नगर परिषदेला मिळाले. आता आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला असून कर विभागाने सोमवारपासून कर वसुलीला सुरुवात केली आहे. यांतर्गत शुक्रवारी (दि.१८) कर वसुली पथकाने शहरातील मरारटोली परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम सील केले. तर पन्नालाल दुबे वॉर्डातील एक गोदामही सील करण्यात आले आहे. पन्नालाल दुबे वॉर्डात सील करण्यात आलेल्या गोदामावर सन २०११ पासून १ लाख ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर एटीएमवर सन २०१५-१६ पासून ८१ हजार रुपयांची थकबाकी आहे. 

थकबाकीचा आकडा घटला - पाहिजे त्या प्रमाणात कर वसुली होत नसल्याने मालमत्ता कराची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. त्यातही चालू मागणीपेक्षा थकबाकीचा आकडा जास्त असायचा. मात्र मागील वर्षी कर विभागाने केलेल्या कर वसुलीने थकबाकी आकडा आता चालू मागणीपेक्षा कमी दिसून येत आहे. यंदा नगर परिषदेची ५ कोटींची चालू मागणी असून तीन कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ११ हजार रुपयांचीच वसुली झाली आहे. मोहिम सुरू झाल्याने त्यात आता भर पडणार. 

प्रत्येक वॉर्डासाठी विशेष वसुली पथकमालमत्ता कर वसुलीसाठी आता प्रत्येक वॉर्डामध्ये विशेष वसुली पथक जाणार आहे. कर भरल्यास पथक रहिवासी मालमत्ता, दुकान, कोचिंग क्लास, शासकीय, निमशासकीय थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करणार आहे. - विशाल बनकर, उपमुख्याधिकारी, न.प., गोंदिया

 

टॅग्स :Taxकर