शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अटल महापणन विकास अभियान

By admin | Updated: January 7, 2017 02:04 IST

राज्यातील सहकारी पणन महासंघ, जिल्हा/तालुका खरेदी विक्र ी संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

१० जानेवारीला कार्यशाळा : शेतकऱ्यांना कृषी पणन विषयक सुविधा गोंदिया : राज्यातील सहकारी पणन महासंघ, जिल्हा/तालुका खरेदी विक्र ी संघ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या बळकटीकरणासाठी शासनाने राज्यात अटल महापणन विकास अभियान ३१ मार्च २०१७ अखेर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची उद्दिष्ट्य विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व खरेदी विक्र ी संघ यांच्या कामात सुधारणा करून त्यांचे बळकटीकरण करणे व पणनच्या या त्रिस्तरीय रचनेच्या बळकटीकरणातून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पणनविषयक सुविधा देवून आर्थिक उलाढाल वाढविणे हे आहे. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी राबविण्याचे उपक्र म असे आहेत. गावातील १०० टक्के शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सभासद करु न घेणे. तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला तालुका खरेदी विक्र ी संघाचा सभासद करु न घेणे. प्रत्येक खरेदी विक्र ी संघ व प्रक्रि या संस्था पणन महासंघाची सभासद असणे आणि पणन महासंघाचे सर्व उपक्रम, खरेदी विक्र ी संघाचे सर्व उपक्र म विविध कार्यकारी सहकारी सोसायटीद्वारे राबविणे. नियमाप्रमाणे या संस्थानी इतराकडे असणाऱ्या त्यांच्या थकीत रकमांची वसुली करणे, पणन महासंघ व इतर संस्थाची गोदामे याचा वापर पूर्ण क्षमतेने करणे इत्यादीच्या माध्यमातून स्वत:चे खेळते भांडवल उभे करणे व आर्थिक स्थिती सुधारणे. पणन महासंघाने या संस्थांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मदतीने किमान आधारभूत किंमत योजना व भाव स्थिरता निधी योजनेंतर्गत खुल्या बाजारात अन्नधान्य गतीमान करणे. पणन महासंघाने त्यांच्या स्वत:च्या खत कारखान्याचा भागीरथ खताचे व पशुखाद्य कारखान्याचे वैभव पशुखाद्याचे उत्पादन वाढवून या सभासद संस्थाच्या माध्यमातून विक्री वाढविणे. या संस्थानी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा जसे- रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रीय खते, बुरशीनाशके, तणनाशके, कीटकनाशके, बियाणे, कृषी अवजारे इत्यादीची खरेदी विक्री वाढविणे. या संस्थांनी शासनाच्या इतर योजना जसे- रेशन दुकान, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा यांना पोषण आहार पुरवठा इत्यादीमध्ये सक्रीय सहभाग घेवून उत्पन्न वाढविणे. कृषी मालाची खरेदी करु न स्वच्छता प्रतवारी करु न त्यांचे पॅकेजिंग, लेबलिंग, बॅडिग करु न विक्र ी करणे तसेच गरजेप्रमाणे जीवनावश्यक वस्तु खरेदी विक्र ी वा इतर कोणत्याही क्षेत्रात उतरु न संस्थांची आर्थिक उलाढाल वाढविणे. सहकाराचे छोटे रूप असणाऱ्या महिला स्वयंसहायता गटाची, बचतगटाची उत्पादने व रोपाची विक्र ी या संस्थाद्वारे करु न सहकारी पणन व्यवस्था विकसीत करणे. या उपक्र माच्या अनुषंगाने अटल महापणन विकास अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.गोंदिया येथील सभागृहात १० जानेवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व खरेदी विक्र ी संघाचे पदाधिकारी व संचालक व्यवस्थापक, सदस्य, उत्पादक खते बियाणे इत्यादींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.(प्रतिनिधी)