शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारु हटविण्याचे दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:07 IST

रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरुवारपासून महिलांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.

ठळक मुद्देपाच महिला गंभीर : अधिकाºयांच्या भेटीनंतर उपोषण सुटले

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरुवारपासून महिलांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या तिसºया दिवशी पाच महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या उपोषण मंडपाला वरिष्ठ अधिकाºयांनी भेट देऊन महिलांना उपोषण सोडण्यास भाग पाडले.रिसामा येथील देशी दारु दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन रिसामा येथील महिलांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यात महिलांसोबत दारुड्यांची हुज्जत बाजी झाली. महिलांना धमकविणाºया ठाणेदारांसंदर्भात महिलांमध्ये तीव्र असंतोष होता. तिसरा दिवस उजाडताच उपोषण मंडपात बसलेल्या १५ महिलांपैकी पाच महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून शनिवारी (दि.९) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चिलमुलवार, तहसीलदार साहेबराव राठोड, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश नवले व इतर अधिकाºयांनी सायंकाळी उपोषण मंडपाला भेट देऊन महिलांची समजूत काढली. सदर देशी दारु दुकान हटविण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच उपोषणावर बसलेल्या महिलांचे उपोषण सोडविण्यात आले.या दारू दुकानामुळे रिसामा येथील समाजस्वास्थ धोक्यात आले होते. महिलांना हे नकोसे झाल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सदर दारू दुकान हटविण्याच्या मागणीला घेऊन गुरूवार पासून उपोषण सुरू केले होते. कोणत्याही राजकारण्यांची मदत न घेता त्यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला सर्व गावकºयांनी पाठींबा दर्शविला. उपोषणावर बसलेल्या महिलांशी दारूड्यांचा वादही झाला. धक्काबुक्की झाली तरीही महिलांनी न घाबरता आपला लढा सुरूच ठेवला. उपोषणावर तृप्ती बहेकार, हेमलता पागोटे, लीला मेंढे, गीता ब्राम्हणकर, सरस्वता भांडारकर, सरस्वता हेमने, भागरथा पागोटे, माजी सरपंच फुलन चुटे, निर्मला बोहरे, रता पागोटे, मालन तुमसरे, इंदू ब्राम्हणकर, शोभा मेंढे बसल्या होत्या. निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.पाच महिला रुग्णालयातउपोषणावर बसलेल्या महिलांपैकी सुशीला बहेकार, तृप्ती बहेकार, छबू उके, सरस्वता हेमने, लिला मेंढे या महिलांची प्रकृत खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी तृप्ती बहेकार, छबू उके व लिला मेंढे या तिघ्या उपोषण सुटल्यानंतरही बेशुध्दच होत्या. रात्रभर त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.