शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By admin | Updated: May 17, 2015 01:52 IST

नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात ...

गोंदिया : नववर्ष काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही लागले आहे. कारण नववर्षातील या साडेचार महिन्यांच्या काळात २७ आगजळीच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या आगजळीत कित्येकांच्या रोजीरोटीवर गाज पडली असून कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दीड कोटींच्या वर मालमत्ता जळून खास झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली आहे. आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तीशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते. तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानी बाळगली तरिही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात आग या तत्वाकडे लक्ष दिल्यास सन २०१५ च्या सुरूवातीच्या साडेचार महिन्यांत तब्बल २७ घटना घडल्या आहेत. आगजळीच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या २७ घटनांतील १५ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. वर्षाच्या सुरूवातीच्या फक्त साडेचार वर्षांतील हा आकडा बघता जिल्हा हादरून गेला आहे. यात आगजळींच्या घटनांची महिन्यानुसार आकडेवारी बघितल्यास जानेवारी महिन्यात सहा, फेब्रुवारी महिन्यात तीन, मार्च महिन्यात ४, एप्रिल महिन्यात सात तर सुरे असलेल्या मे महिन्याच्या १५ दिवसांत सात घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांना बघता हे वर्ष खरोखरच काहींना भाग्याचे लागले असेल यात शंका नाही. मात्र आगजळींच्या घटनांत आपले सर्व काही गमावून बसलेल्यांना विचारल्यास त्यांच्या डोळ््यात अश्रूच दिसणार. (शहर प्रतिनिधी)घर जळण्याच्या घटना अधिक आगजळी या घटनांत १५ घटना शहराबाहेरील आहेत. असून त्यातही घर व गोठे जळण्याच्या १३ घटना घडल्या आहेत. तर अन्य घटनांत गोदाम, पानटपऱ्या दुकान आदिंचा समावेश आहे. यामुळेच या अग्नितांडवात कित्येकांच्या घरावरचे छत हिरावल्या गेले. तर कित्येकांच्या रोजीरोजीवरच गाज पडल्याचे दिसून येते. कारण जानेवारी महिन्यांतील घटनांत तीन लाख १० हजार रूपये, फेब्रुवारी महिन्यात तीन लाख ७५ हजार रूपये, मार्च महिन्यात सात लाख ५० हजार रूपये, एप्रिल महिन्यात २४ लाख ५० हजार रूपये तर मे महिन्यात एक कोटी पाच लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता जळून खाल झाली आहे. विशेष म्हणजे यातही काही घटनांतील झालेल्या नुकसानीची नोंद नाही. अन्यथा नुकसानीची ही आकडेवारी आणखी वाढणार.