शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:09 IST

आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था आहे. पौराणिक काळात आश्रमातूनच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन गोरेगाव येथील प्रा. किशोर पटले यांनी केले.

ठळक मुद्देकिशोर पटले : शेंडा येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा

ऑनलाईन लोकमतशेंडा (कोयलारी) : आश्रम शाळा म्हणजे भावी पिढी घडविणारी संस्था आहे. पौराणिक काळात आश्रमातूनच शिक्षण दिले जात होते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन गोरेगाव येथील प्रा. किशोर पटले यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीच्या वतीने शेंडा येथील आश्रम शाळेच्या संकुलात विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.महामानव बिरसा मुंडा, राजे शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांची पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. उद्घाटन जि.प. सदस्य सरिता विलास कापगते यांच्या हस्ते, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही.एम. टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी मार्गदर्शक व अतिथी म्हणून प्रा. किशोर पटले, सरपंच मोहनलाल बोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पंधरे, उपसरपंच वच्छला मरस्कोल्हे, ग्रा.पं. सदस्य जितेश मानवटकर, रामदास चिचाम, प्रकाश पुराम, धृपता उईके, शालीनी बोरकर, जसुकला उईके, मालता उईके, कृपासागर जनबंधू, मंगल वैद्य, विलास कापगते, चंद्रमनी बन्सोड, छत्रपाल परतेकी, यशवंत सलामे, अनिल पंधरे व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रा. पटले पुढे म्हणाले, शिक्षणाशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही. याचे अनेक उदाहरणे सादर करून ते म्हणाले, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे. त्याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.विद्यार्थ्यांना लहानपणापासून घडविण्याची जबाबदारी आई व पालकांची असते. पाल्य शिक्षण घेतेवेळी त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यासंबंधी शाळा प्रशासनाशी वेळोवेळी संबंध साधून त्यांच्या शालेय प्रगतीविषयाी माहिती घ्यावी. शासनाकडून मिळणाºया निधीचा वापर स्वत:साठी न करता शिक्षण साहित्यावरच खर्ची घालावा. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत जवळीक साधून त्यांना स्वत:ची मुले समजून त्यांच्याशी हितगूज करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.प्रास्ताविकातून मुख्याध्यापक एम.डी. बारसागडे यांनी शाळेचा कार्यवृत्तांत सादर करताना विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळाव्याचे आयोजन का करण्यात येते, यावर माहिती दिली. या वेळी माजी उपसरपंच छत्रपाल परतेकी, सरपंच मोहनलाल बोरकर, टेंभुर्णीकर, सरिता कापगते यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी राष्टÑगीत, लावणी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.संचालन प्रा.व्ही.डी. खडतकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक एस.डी. बारसागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.