शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांना मिळणार दोन लाखांचा विमा

By admin | Updated: September 17, 2016 02:09 IST

महिलांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कठिण परिश्रम करणाऱ्या आशा सेविका

केंद्र शासनाकडून ९.१७ लाख मंजूर : जिल्ह्यातील १,११४ कर्मचाऱ्यांना लाभ, आरोग्य संचालकांची सीईओंना सूचनादेवानंद शहारे  गोंदियामहिलांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कठिण परिश्रम करणाऱ्या आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने राज्य शासनाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत विमा काढण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात कार्यरत एक हजार १०७ आशा स्वयंसेविका व सात गट प्रवर्तकांना याचा लाभ मिळणार आहे.राज्यात आशा स्वयंसेविका योजना सुरू करण्यास प्रारूपाला केंद्र सरकारद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. यात आशा स्वयंसेविकांना वेळोवेळी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयात रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी स्थानिक वाहनाने ये-जा करावी लागते. या सेवेदरम्यान स्वयंसेविकांच्या मृत्यूची घटना यापूर्वी घडली आहे व त्या घटनेमुळेच सदर निर्णय घेण्यात आला आहे.केंद्र सरकारद्वारे राज्यात आशा स्वयंसेविका योजनेंतर्गत सन २०१६-१७ च्या प्रारूपानुसार, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासाठी ९.१७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून नियुक्त सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना विम्याचा लाभ मिळू शकेल. १८ ते ७० वर्षाच्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा विमा काढण्यात येणार आहे. यासाठी आशाचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकासह संलग्न करणे गरजेचे आहे. बँक खाते नसल्यास आधारकार्डची प्रत जमा करून विमा काढला जावू शकेल. दरवर्षीचे प्रीमियम १२ रूपये आहे. ही रक्कम आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यातून कपात केली जाईल. असा मिळेल लाभविमाकर्ता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांची मदत दिली जाईल. दोन्ही डोळ्यांना क्षति झाल्यास किंवा डोळा खराब झाल्यास, दोन्ही हातांना क्षति झाल्यास किंवा पाय क्षतिग्रस्त झाल्यावरही एवढीच मदत दिली जाईल. एक डोळा खराब झाल्यास किंवा एक हात किंवा एका पायाची हानी झाल्यास एक लाख रूपयांची मदत दिली जाईल. यासाठी घेण्यात आला निर्णयधुळे येथील रस्ता अपघातात सात आशा स्वयंसेविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आधारावर केंद्र शासनाद्वारे आशा स्वयंसेविका योजना या वर्षापासून राज्यात लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात एक हजार ११५ आशा स्वयंसेविकांची पदे आहेत. यात एक हजार १०७ कार्यरत आहेत. तसेच सात गट प्रवर्तक कार्यरत आहेत. सर्वांचा विमा काढण्यात येणार आहे.