शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अर्जुनी जिल्हा बँकेतील अफरातफर ११ कोटींवर

By admin | Updated: January 9, 2017 00:51 IST

दि गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेच्या अफरातफर प्रकरणी आणखी दोन आरोपींना शनिवारी

लेखा परीक्षणात स्पष्ट : पाच वर्षानंतर आणखी दोन आरोपींना अटक अर्जुनी मोरगाव : दि गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेच्या अफरातफर प्रकरणी आणखी दोन आरोपींना शनिवारी (दि.७) अटक करण्यात आली. आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षानंतर दोन आरोपींना अटक झाल्याने खळबळ माजली आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १६ फेब्रुवारी २०१२ रोजी १ कोटी ९४ लाख रुपयाची अफरातफर उघडकीस आली होती. खोटा हिशेब व बनावट दस्तावेज तयार करुन अफरातफर केल्याप्रकरणी त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिलीप तुळशीराम गायधने (४३), भूमेश्वर काशीराम चामलाटे (३०), विनोद यशवंत नाकाडे (३२), खेमराज उर्फ बंडू सोनवाने (३४), सुनील पंढरी देशमुख (३३), शैलेश धिरेंद्रसिंह बडगुजर (३४), देवीदास बाजीराव हेमणे (३५) व संदीप रतीराम कापगते (३२) या आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचेविरुद्ध गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. सन २००६ ते २०११ या कालावधीत अफरातफर झाल्याने फेर लेखा परिक्षण करण्यात आले. सहकारी संस्था (साखर) नागपूरचे विशेष लेखा परीक्षक एम.एस. आटे यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अहवाल सादर केला. यावरुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रम चंपालाल त्रिवेदी यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लेखा परीक्षणाच्या अहवालात अफरातफरीची राशी १० कोटी ८९ लाख ९७ हजार ३६६ रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी आणखी अटक झालेल्या दोन आरोपीत जितेंद्र शामराव धरमशहारे (४०) देवरी तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भालचंद्र पाटील (६६) भंडारा यांचा समावेश आहे. त्यांचेविरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४०९, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४७७ (अ), ४११, ४१३, १०९, ११४, १२० (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात अ ाला आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. आमगावचे उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)